Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश चांद्रयान-3 च्या यशस्वीतेसोबतच भारताचे आणखी एक यश; वाचा- कोणते परीक्षण झाले यशस्वी?

चांद्रयान-3 च्या यशस्वीतेसोबतच भारताचे आणखी एक यश; वाचा- कोणते परीक्षण झाले यशस्वी?

Subscribe

भारताच्या चांद्रयान-3 ने जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतरून आपला तिरंगा ध्वज फडकवला त्याच वेळी आकाशात एक प्रक्रिया पूर्ण होताना दिसले.

नवी दिल्ली : चंद्राच्या दक्षिण ध्रृवार पाऊल ठेवत भारताने इतिहास रचला आहे. चांद्रयान-3 च्या या ऐतिहासिक कामगिरीच्या आनंदोत्सवात सगळे देशवासीय असतानाच भारताने पुन्हा एक यश संपादन केले आहे. मात्र, त्याकडे कुणाचेच लक्ष नव्हते. ते यश कोणते हेच तुम्हाला आम्ही या बातमीतून सांगणार आहोत.(Along with the success of Chandrayaan-3, another success of India; Read – Which Tests Succeed?)

भारताच्या चांद्रयान-3 ने जेव्हा चंद्राच्या दक्षिण ध्रृवावर उतरून आपला तिरंगा ध्वज फडकवला त्याच वेळी आकाशात एक प्रक्रिया पूर्ण होताना दिसले. ती म्हणजे तेजस एअरक्राफ्टने हवेतच वार करणाऱ्या अस्त्र मिसाइलचे यशस्वी परीक्षण केले. बुधवारी गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर 20 हजार फूट उंचीवरून हे परीक्षण पूर्ण करण्यात आले. एवढेच नव्हे तर या मिसाइलने अदृश्य असलेल्या लक्षालाही भेदले हे विशेष. हे यश म्हणजे भारताच्या संरक्षण विभागातील सर्वात मोठे यश मानले जात आहे. विशेष म्हणजे अस्त्र मिसाइल हे भारतातच बनविले असून, ते पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ज्ञावर आधारीत आहे. हे परीक्षण वायुसेनेचे प्रमुख मार्शल व्ही.आर. चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.

- Advertisement -

हेही वाचा : BRICS: गेटवरच रोखले चीनच्या राष्ट्रपतींचे सुरक्षा रक्षकांना; घडलेल्या प्रकाराने जिनपिंगही अवाक्

हे आहे अस्त्र मिसाइलचे वैशिष्ट्य

अस्त्र-1 मिसाइल हे 100 किलो मीटर पर्यंत मारा करू शकते, म्हणजे जिथे आपला शत्रू दिसतसुद्धा नाही तिथे. या मिसाइला गोव्याच्या समुद्र किनाऱ्यावरून 20 हजार फूट उंचीवरून प्रक्षेपित करण्यात आले होते. डीआरडीओच्या एका अधिकाऱ्याने म्हटले की, या परीक्षणाने सर्व उद्दीष्टांना पूर्ण केले आहे. ही पूर्णपणे परीपूर्ण अशी लॉंचिंग होती. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, या अस्त्र मिसाइलमुळे आपण शत्रुच्या सुपरसैनिकांच्या हवाई धोक्यांना टार्गेट करू शकतो. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही या यशस्वी परीक्षणानंतर आनंद व्यक्त केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा : Chandrayaan 3 लँडिंगसाठी दक्षिण ध्रुव निवडण्यामागे ‘हे’ आहे कारण; एस. सोमनाथ म्हणाले…

अस्त्र मिसाइलमुळे परावलंबन दूर झाले

डीआरडीओच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीमध्ये पुढे म्हटले की, या यशस्वी परीक्षणामुळे तेजसच्या ताकदीमध्ये आणखी वाढ झाली आहे. यामुळे आपण आता स्वालंबी झालो असून, आपल्याला परकीय अस्त्र शस्त्राचांसाठी परावलंबित राहण्याची गरज उरली नाही. अस्त्र मिसाइल आवाजाच्या गतीपेक्षा चारपटीने शत्रु ठिकाणावर लक्ष करून त्याला भेदू शकते, विशेष म्हणजे या अस्त्र मिसाइलचा सुखोई-30 MKI च्या फायटर्सकडूनही सरावर करून घेतल्या गेला आहे. तर डीआरडीओने आता पुढील अस्त्र-2 या मिसाइलवरही काम करणे सुरू केले असून, ते मिसाइल 160 किलो मीटर दूरवर असलेल्या शत्रुला टार्गेट करू शकणार आहे.

- Advertisment -