घर देश-विदेश जिनपिंग, पुतीनसह आता स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांचीही जी-20 शिखर परिषदेला दांडी; कोरोनाचे कारण

जिनपिंग, पुतीनसह आता स्पेनच्या राष्ट्राध्यक्षांचीही जी-20 शिखर परिषदेला दांडी; कोरोनाचे कारण

Subscribe

स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांजेच हे गुरुवारी कोरोना संक्रमित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे ते आता भारतात होऊ घातलेल्या जी-20 शिखर परिषदेला अनुपस्थित राहणार आहेत.

नवी दिल्ली : जी-20 शिखर परिषदेचे यजमानपद भारताकडे असून, 9 आणि 10 सप्टेंबर दरम्यान ही परिषद दिल्लीत पार पडणार आहे. मात्र, शिखर परिषदेकडे अनेक देशांच्या राष्ट्राध्यक्षांनी पाठ फिरवली आहे. याआधी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे या बैठकीला हजर राहणार नसून, त्यामध्ये आता स्पेनच्याही राष्ट्राध्यक्षांची भर पडली आहे. त्यांनी कोरोनाचे कारण देत बैठकीला येणे टाळले आहे.(Along with Xi Jinping, Putin, now the president of Spain also wants to attend the G20 summit; Cause of Corona)

स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांजेच हे गुरुवारी कोरोना संक्रमित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यामुळे ते आता भारतात होऊ घातलेल्या जी-20 शिखर परिषदेला अनुपस्थित राहणार आहेत. ते शिखर परिषदेला येणार होते मात्र, कोरोना झाल्यामुळे त्यांचा दौरा रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या शिखर परिषदेला कोण-कोण हजर राहते हे पहावे लागणार आहे.

तर मग उपराष्ट्राध्यक्ष राहणार हजर

- Advertisement -

सोशल मीडियावर पोस्ट करत स्पेनचे राष्ट्राध्यक्ष पेड्रो सांचेज यांनी आपल्याला कोरोना झाला असल्याची माहिती दिली. त्यामुळे ते गैरहजर राहणार आहेत. त्यांच्या जागी मात्र स्पेनचे उपराष्ट्राध्यक्ष नादिया कॅल्व्हिनो आता जी-20 परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

अनुपस्थित राहणारे तिसरे राष्ट्राध्यक्ष

भारतात होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेला अनुपस्थित राहणाऱ्यांमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांचा समावेश होता. आता त्यानंतर स्पेनचे राष्ट्राध्य पेड्रो सांचेझ हे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत की जे भारतात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत.

- Advertisement -

हेही वाचा : कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर बायडन भारताकडे रवाना; सायंकाळी करणारा मोदी स्वागत

जी-20 साठी राजधानी दिल्ली तयार

नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे जी-20 शिखर परिषदेसाठी मंच तयार करण्यात आला आहे. भारताच्या अध्यक्षतेखाली पहिल्यांदाच जी-20 ची बैठक होत आहे. जी-20 परिषदेच्या यशस्वी आयोजनातून भारताला आपली सॉफ्ट पॉवर जगाला दाखवायची आहे. त्यामुळेच ही परिषद संस्मरणीय व्हावी यासाठी भारत प्रयत्नशील आहे. या परिषदेत सहभागी होण्यासाठी जगातील अनेक मोठे नेते भारतात येत आहेत.

हेही वाचा : India vs Bharat : देशाचे नाव बदलण्याची विनंती आल्यास….; UN ची महत्त्वपूर्ण टिप्पणी

देशातील 60 शहरांमध्ये 200 सभा पडल्या पार

भारताने गेल्या वर्षी 1 डिसेंबर रोजी जी-20 चे अध्यक्षपद स्वीकारले. तेव्हापासून भारताने देशातील 60 शहरांमध्ये 200 सभा आयोजित केल्या आहेत. आता जी-20 ची 18 वी शिखर परिषद नवी दिल्लीत होणार आहे. या शिखर परिषदेत भारत जी-20 चे अध्यक्षपद ब्राझीलकडे सोपवणार आहे. 2024 मध्ये ब्राझीलनंतर दक्षिण आफ्रिकेला 2025 मध्ये जी-20 चे अध्यक्षपद मिळेल.

- Advertisment -