Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश Alphabet Layoffs: Google ची मूळ कंपनी Alphabet नं शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Alphabet Layoffs: Google ची मूळ कंपनी Alphabet नं शेकडो कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Subscribe

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे यावेळी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. टेक जायंटने जागतिक भर्ती संघातून कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी ही पहिली "बिग टेक" कंपनी आहे.

गुगलची मूळ कंपनी अल्फाबेटने पुन्हा एकदा मोठा निर्णय घेतला आहे यावेळी शेकडो कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्यात आले आहे. टेक जायंटने जागतिक भर्ती संघातून कर्मचाऱ्यांना काढून टाकले आहे. नवीन आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत कर्मचाऱ्यांना काढून टाकणारी ही पहिली “बिग टेक” कंपनी आहे. 2023 च्या सुरुवातीला मेटा, मायक्रोसॉफ्ट आणि अॅमेझॉन सारख्या अनेक मोठ्या कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात केली होती. (Alphabet Layoffs Google s parent company Alphabet has given coconuts to hundreds of employees)

अल्फाबेटनं आधीही कमी केलेत कर्मचारी

Google ची मूळ कंपनी Alphabet ने जानेवारीमध्ये भरती आणि अभियांत्रिकीसह सुमारे 12,000 लोकांना कामावरून काढून टाकलं होतं. जगभरातून एकूण सुमारे 6 टक्के कर्मचारी कमी करण्यात आले होते. Amazon ने 18,000 नोकऱ्या कपातीची घोषणा केली होती. काही आठवड्यांनंतर, मायक्रोसॉफ्टने 10,000 कर्मचार्‍यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.

- Advertisement -

अमेरिकेसह जागतिक स्तरावर कर्मचारीकपातीची प्रक्रिया सुरू आहे. मोठ्या कंपन्यांसोबतच स्टार्टअप्सनीही आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला आहे.

डेलॉयने एप्रिलमध्ये 1200 लोकांना कामावरून काढून टाकले

डेलॉइटचे मुख्य कार्यकारी रिचर्ड ह्यूस्टन यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, आज आम्ही आमच्या व्यवसायात काही लक्ष्यित पुनर्रचना जाहीर केल्या आहेत. सध्या यावर सल्लामसलत सुरू आहे. अंमलबजावणी केल्यास, काही लोकांना कामावरून काढले जाऊ शकते. परंतु, डेलॉइटने एप्रिलमध्येच यूएसमध्ये 1 हजार 200 लोकांना कामावरून काढून टाकले होते.

- Advertisement -

(हेही वाचा: ‘द्रमुक’मुळे ‘इंडिया’ आघाडीस कोणतेही तडे जाणार नाहीत, तर्क मांडत ठाकरे गटाचा दावा )

- Advertisment -