ऑल्ट न्यूजचे सहसंस्थापक मोहम्मद झुबेर यांना अटक, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल टीमकडून कारवाई

ऑल्ट न्यूज (alt news)या वृत्तसंकेतस्थळाचे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर mohammad-zubair यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने अटक केली आहे

ऑल्ट न्यूज (alt news)या वृत्तसंकेतस्थळाचे सहसंस्थापक मोहम्मद जुबैर mohammad-zubair यांना दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेल टीमने अटक केली आहे. सोशल मीडियावरून (twitter) धार्मिक भावना भडकावल्याचा आरोप त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांनी भारतीय दंडविधान कलम १५३/२९५ याअंतर्गत ही कारवाी केली आहे.

जुबैर यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या एका प्रकरणाशी संबंधित योग्य पुरावे पोलिसांच्या हाती लागल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. जुबैर यांना दंडाधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात येणार आहे.  जुबैर यांना पोलिसांनी एका जुन्या प्रकरणाच्या चौकशीसाठी बोलावले होते. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. ऑल्ट न्यूज या वेबसाईटचे संस्थापक प्रतीक सिन्हा असून जुबैर हा सहसंस्थापक आहे. जुबैर याला अटक केल्यानंतर एआयएमआयएमचे IMIM प्रमुख असुद्दीन औवेसी यांनी या घटनेचा निषेध केला आहे. मोहम्मद जुबैरची अटक ही निंदनिय आहे. कुठलीही नोटीस न देता एका अज्ञात प्रकरणी त्याला अटक करण्यात आली आहे. दिल्ली पोलीस मुस्लिमांविरोधी नरसंहार करणाऱ्यांविरोधात कुठलीच कारवाई करत नाही. पण त्या घटनेची तक्रार करणाऱ्यांविरोधात मात्र कारवाई करत आहे. असा आरोप ओवैस्सी यांनी केला आहे.