Amar Jawan Jyoti: शहीदांच्या स्मरणार्थ ५ दशकांपासून प्रज्वलित अमर जवान ज्योतिचा राष्ट्रीय युद्ध स्मारकात समावेश होणार

भारतीय जवानांच्या शूर सुपुत्रांच्या स्मरणार्थ मागील ५० वर्षांपासून इंडिया गेटवर अमर जवान ज्योत पेटत आहे. परंतु आता या अमर जवान ज्योतिचा राष्ट्रीय युद्ध स्मारकात समावेश होणार आहे. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१९ मध्ये राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्घाटन केलं होतं. शुक्रवारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रज्वलित अमर जवान ज्योतिला नवीन ठिकाणी स्थान देण्यात येणार आहे. प्रजासत्ताक दिनापूर्वी लष्करी अधिकाऱ्यांसह पंतप्रधान युद्धस्मारकाला पुष्पहार अर्पण करतात.

शुक्रवारी दुपारी होणाऱ्या कार्यक्रमामध्ये प्रज्वलित ज्योतचा काही भाग इंडिया गेटपासून राष्ट्रीय युद्ध स्मारकापर्यंत घेऊन जाण्यात येणार आहे. त्यानंतर इंडिया गेटवरील ज्योत विझवली जाईल. इंजिया गेटजवळ राष्ट्रीय यु्द्ध स्मारक ४० एकरपेक्षा अधिक जागेत बांधण्यात आलं आहे. स्वातंत्र्य भारतासाठी शहीद झालेल्या २६ हजारांहून अधिक भारतीय सैनिकांच्या नावांची नोंद आहे. तसेच येथे राष्ट्रीय युद्ध संग्रहालय देखील आहे.

भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतिची स्थापना

१९७१ मध्ये भारत आणि पाक युद्धात शहीद झालेल्या भारतीय जवानांच्या स्मरणार्थ अमर जवान ज्योतिची स्थापना करण्यात आली आहे. या युद्धात भारताचा विजय झाला असून बांगलादेशची निर्मिती झाली. २६ जानेवारी १९७२ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी याचे उद्घाटन केले होते. इंडिया गेट येथील अमर जवान ज्योति सर्व जवानांच्या आणि सैनिकांच्या सम्मानासाठी एक स्मारक आहे.

इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार, भारतासाठी अनेक युद्धांमध्ये प्राण गमावणाऱ्या जवानांना श्रद्धांजली देण्यासाठी कोणत्याही प्रकारचं यु्द्ध स्मारक नव्हतं. त्यामुळे इंडिया गेटवर ही अमर जवान ज्योति होती. परंतु आता अमर जवान ज्योतिचा राष्ट्रीय युद्ध स्मारकात समावेश होणार आहे.

राहुल गांधींचा पीएम मोदींवर हल्लाबोल

आपल्या शूर भारतीय जवानांसाठी अमर ज्योत पेटत होती. परंतु आता ही विझवली जाणार आहे. त्यामुळे ही अत्यंत दुख:ची बाब आहे. काही लोकांना देशप्रेम आणि त्याग समझत नाही, काही हरकत नाही. परंतु आम्ही आमच्या सैनिकांसाठी अमर जवान ज्योति पुन्हा एकदा पेटवू, असं ट्विट काँग्रेस नेते राहुल गांधींनी करत पीएम मोदींवर निशाणा साधला आहे.


हेही वाचा : ICC T20 World Cup 2022 : महामुकाबला ! Ind vs Pak सामन्याची तारीख जाहीर, T20 वर्ल्ड कपचे संपूर्ण वेळापत्रक