घरदेश-विदेशव्हिडिओ: अमर सिंगच म्हणतात 'टायगर जिंदा है'

व्हिडिओ: अमर सिंगच म्हणतात ‘टायगर जिंदा है’

Subscribe

अमर सिंघ यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली होती.

समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंग यांनी काही दिवसांपूर्वी बॉलिवूड महानायक अमिताभ बच्चन आणि त्यांच्या कुटुंबाची माफी मागितली होती. दरम्यान, सिंगापुरमध्ये मृत्यूशी सामना करत असल्याचे सांगितले होते. त्यानंतर समाजवादी पक्षाचे नेते अमर सिंग यांचा मृत्यू झाल्याची अफवा पसरवण्यात आली. बातमी ऐकून सर्वांच्या भुवया उंचावल्या. मात्र, यावर स्वत: अमर सिंग यांनी मृत्यू झाला ही अफवा असल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबतचा व्हिडिओ त्यांनी ट्वीटर अकाउंटवरुन शेअर केला आहे.

- Advertisement -

काय म्हणाले अमर सिंग?

अमर सिंग यांनी टायगर जिंदा है अशा आशयाखाली व्हिडिओ पोस्ट केला आहे. “मी सिंगापूरमधून अमर सिंग बोलत आहे. मी आजारी आहे. मी व्याधीने त्रस्त आहे. पण मला भीती वाटत नाही. धैर्य शिल्लक आहे, उत्कटता बाकी आहे, देहभान देखील बाकी आहे. यमराजने मला स्वत: कडे बोलावले अशी अफवा आमच्या शुभचिंतक आणि मित्रांनी वेगाने पसरवली. मात्र, तसे काही नाही. मी उपचार घेत आहे. जर आई भगवतीची इच्छा असेल तर मी शस्त्रक्रियेनंतर लवकरच दुप्पट ताकदीने परत येईन… जसा पण मी आहे, मी तुमचा आहे. जर मी वाईट किंवा चांगला… मी माझ्या ज्ञात शैली, परंपरेनुसार आतापर्यंत जगलो आहे त्याप्रमाणे मी जगेन.”


हेही वाचा – ‘मनकी बात’मध्ये पंतप्रधान करणार मोठी घोषणा, सोशल मिडिया सोडण्याचा करणार उलगडा

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -