Friday, May 7, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE Coronavirus: अमरनाथ यात्रा केली रद्द; कोरोनामुळे घेतला निर्णय

Coronavirus: अमरनाथ यात्रा केली रद्द; कोरोनामुळे घेतला निर्णय

देशातील कोरोनाचं संकट लक्षात घेत श्री अमरनाथजी श्राइन बोर्डाने अमरनाथ यात्रा रद्द केली आहे.

Related Story

- Advertisement -

देशात कोरोनाचे रुग्ण दिवसागणीक वाढत आहेत. कोरोना विषाणूमुळे देश लॉकडाऊन करण्यात आला आहे. दरम्यान, आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आली आहे. अमरनाथ श्राईन बोर्डाने वर्ष २०२० ची अमरनाथ यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. यावर्षी २३ जून ते ३ ऑगस्ट दरम्यान अमरनाथ यात्रा होणार होती. जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल आणि श्री अमरनाथजी श्राइन बोर्डचे अध्यक्ष गिरीशचंद्र मुर्मू यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीनंतर अमरनाथ श्राईन बोर्डाने हा निर्णय घेतला आहे.

अमरनाथ यात्रेच्या मार्गात कोरोनाचे ७७ रेड झोन आहेत. यामुळे, लंगर बसवणे, वैद्यकीय सुविधा, छावणी उभारणे, मालाची वाहतूक करणे, वाटेतील बर्फ हटवणे शक्य नाही. उपराज्यपाल मुर्मू म्हणाले की, सरकारने या लॉकडाऊन ३ मे पर्यंत वाढवला आहे. मात्र, कोरोना विषाणूमुळे देश किती दिवस बंद राहिल याची माहिती नाही. ते म्हणाले की, प्रवाशांची सुरक्षितता ही सरकार आणि प्रशासनाची सर्वात मोठी प्राथमिकता आहे.


- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: गरीब देशांमध्ये होऊ शकते ऑक्सिजनची कमतरता; शास्त्रज्ञांनी दिला इशारा


पहिली आणि अंतिम पूजा पारंपारिक पद्धतीने होणार

सद्य परिस्थिती लक्षात घेता मंडळाने सर्वानुमते निर्णय घेतला की सन २०२० मध्ये अमरनाथ यात्रा करणं शक्य होणार नाही. तथापि, बाबा बर्फानीची प्रथम पूजा आणि अंतिम पूजा पारंपारिक पद्धतीनं केली जाईल, असंही मंडळाने ठरवलं आहे.

बाबा बर्फानी ऑनलाइन दर्शन देणार

- Advertisement -

जगभरात पसरलेल्या बाबाच्या भक्तांसाठी ऑनलाईन पूजा आणि शिवलिंग दर्शन देण्याचा मंडळाचा विचार आहे. दरवर्षी जून महिन्यात अमरनाथ यात्रा सुरू होते आणि सुमारे 2 महिन्यांपर्यंत लाखो भाविक या यात्रेस सामील होतात. काश्मीरच्या इतिहासात प्रथमच अमरनाथ यात्रा रद्द करावी लागली आहे.

 

- Advertisement -