घरदेश-विदेशसेन यांच्या सल्ल्याने ममता बॅनर्जींच्या आशा पल्लवित; पंतप्रधानपदाचे लागले वेध

सेन यांच्या सल्ल्याने ममता बॅनर्जींच्या आशा पल्लवित; पंतप्रधानपदाचे लागले वेध

Subscribe

भारताचा पुढील पंतप्रधान होण्याचे सामर्थ्य व क्षमता ममता बॅनर्जी यांच्यामध्ये आहे. भाजपविषयी नागरिकांच्या मनात रोष आहे. हा रोषच नागरिकांना ममता बॅनर्जी यांच्याकडे आकर्षित करतो. २०२४ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे भाजपकडे पुन्हा सत्ता येणार नाही, असे भाकीत अमर्त्य सेन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

नवी दिल्लीः नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांनी ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान होण्याचा सल्ला दिला आहे. अमर्त्य सेन यांच्या या सल्ल्याचा सर्वांनी गांभीर्याने विचार करायला हवा, असे दस्तुरखुद्द ममता बॅनर्जी यांनी सांगितले आहे.

अमर्त्य सेन हे जगप्रसिद्ध विचारवंत आहेत. त्यांचे ज्ञान व आकलन सर्वांना दिशा दाखवत असते. त्यामुळे त्यांचा सल्ला माझ्यासाठी आदेशच आहे. देशातील सद्यस्थितीचा विचार करता सेन यांच्या ज्ञानातून व आकलनातून आलेल्या सल्लाचा सर्वांनीच गांभीर्याने घ्यायला हवा, असे मत ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केले.

- Advertisement -

भारताचा पुढील पंतप्रधान होण्याचे सामर्थ्य व क्षमता ममता बॅनर्जी यांच्यामध्ये आहे. भाजपविषयी नागरिकांच्या मनात रोष आहे. हा रोषच नागरिकांना ममता बॅनर्जी यांच्याकडे आकर्षित करतो. २०२४ च्या निवडणुकीत प्रादेशिक पक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्यामुळे भाजपकडे पुन्हा सत्ता येणार नाही, असे भाकीत अमर्त्य सेन यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.

तृणमूल कॉंग्रेस, द्रमुक व समाजवादी पक्ष यांची नाळ स्थानिक नागरिकांशी जोडलेली आहे. त्यातील द्रमुख हा पक्ष महत्त्वाची भूमिका बजावेल. तृणमूल कॉंग्रेस व समाजवादी पक्षाचे मतदार पारंपारिक आहेत. याचा फटका नक्कीच भाजपला बसेल. केवळ भाजपच सत्तेत राहिल असे म्हणणे योग्य ठरणार नाही. भाजपने हिंदू पक्ष अशी ओळख निर्माण केली आहे. आगामी निवडणुकीत भाजपकडे सत्ता जाईल असे वाटत नाही, असे अमर्त्य सेन म्हणाले आहेत.

- Advertisement -

गेल्या दोन दशकात भाजपने त्यांचे लोकसभेतील संख्याबळ वाढवले आहे. प्रत्येक राज्यात सत्तेत येण्याचा भाजपचा मानस  आहे. साम दाम दंड भेद अशा कोणत्याही पर्यायाचा अवलंब करुन भाजप आपल्या हाती सत्ता घेते, असा विरोधकांचा आरोप आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी विरोधक एकत्र येण्याचे संकेत देतात. त्यासाठी विरोधकांच्या भेटीगाठी होत असतात. स्थानिक पक्षातील पंतप्रधान पदासाठी पात्र असलेल्या नेत्याची चाचपणी अधूनमधून केली जाते. त्यातूनच ममता बॅनर्जी यांचे नाव पंतप्रधान पदासाठी पुढे केले जाते. अमर्त्य सेन यांच्या सल्ल्यानंतर ममता बॅनर्जी यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -