घरदेश-विदेशAmazon कडून नोकर कपात सुरुच; 500 भारतीय कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Amazon कडून नोकर कपात सुरुच; 500 भारतीय कर्मचाऱ्यांना दिला नारळ

Subscribe

Amazon या कंपनीने याआधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता पुन्हा एकदा Amazon कंपनीने 500 भारतीय कंपन्यांना नारळ दिला आहे.

सध्या जगभरामध्ये अनेक दिग्गज टेक कंपन्या आपल्या कर्मचाऱ्यांची कपात करत आहेत. जागतिक आर्थिक मंदीचे कारण देत कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कपात केली जात आहे. Amazon या कंपनीने याआधीही कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता पुन्हा एकदा Amazon कंपनीने 500 भारतीय कंपन्यांना नारळ दिला आहे.(Amazon continues to cut jobs lays off  to 500 Indian employees )

Amazon India ने Amaxon web Services आणि पीपल एक्सपिरिअन्स अँड टेक्नोलॉजी सोल्युशन्स वर्टिकलमधील कर्मचाऱ्यांची कपात केली आहे. आता करण्यात आलेली कर्मचारी कपात याबद्दल मार्च महिन्यातच घोषणा करण्यात आली होती. त्यावेळी कंपनीचे सीईओ अँडी जस्सी म्हणाले होते या कपातीमध्ये 9 हजार कर्मचारी प्रभावित होतील. यावेळच्या कपातीमध्ये कंपनीने भारतीय टीममधील कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप्स दिल्या आहेत.

- Advertisement -

कपातीमागचं कारण काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, सुमारे 500 कर्मचाऱ्यांना या कपातीचा फटका बसला आहे. येत्या काळातही ही प्रक्रिया सुरुच राहणार असल्याची माहिती समोर आली आहे. अॅमेझॉन वेब सर्विस, ह्यूमन रिसोर्स, सपोर्ट फंक्शन या आणि अशा इतर काही विभागांतील कर्मचाऱ्यांना नोकरीला मुकावं लागू शकतं. किंबहुना हा आकडा 1 हजारांवर जाऊ शकतो. AWS चे सीईओ अॅडम सेलिपस्की यांनी एप्रिलमध्ये दिलेल्या इंटर्नल मेमोमध्ये घोषणा केली होती की, AWS मध्ये कर्मचारी कपात ही उत्तर अमेरिकेतील टीम्समधून करण्यात येईल व नंतर जागतिक स्तरावर करण्यात येईल. आर्थिक मंदी आणि कंपनीटच्या महसुलामध्ये झालेली घट ही दोन प्रमुख कारणं यामागे असल्याचं त्यांनी सांगितलं होतं.

( हेही वाचा: Karnataka मुख्यमंत्री पदावरील तिढ्या दरम्यान डी.के. शिवकमार म्हणाले; ‘मी पक्षाला ब्लॅकमेल किंवा बंडखोरी करणार नाही, पण…’ )

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -