घरदेश-विदेशAmazon च्या डिलिव्हरी बॉयचा कारनामा वाचून ऑनलाइन ऑर्डर करणं सोडून द्याल

Amazon च्या डिलिव्हरी बॉयचा कारनामा वाचून ऑनलाइन ऑर्डर करणं सोडून द्याल

Subscribe

ई-कॉमर्स कंपन्यांनी सणासुदीचं औचित्य साधत सेलचं आयोजन केलं असून यामध्ये ऑफर्सचा पाऊस पडत आहे. या मेगासेलचा फायदा घेत अनेक महागड्या वस्तू ऑर्डर करत आहेत. मात्र, ऑनलाईन ऑर्डर करताना काळजी घ्या. नाहीतर तुमची फसवणूक होण्याची जास्त शक्यता आहे. कारण दिल्लीतील एका व्यक्तीसोबत फसवणूक झाली आहे.

एका ग्राहकाने Amazon वरुन एक स्मार्टफोन ऑर्डर केला. ऑर्डर स्विकारल्याचा मॅसेज त्या ग्राहकाला आला. मात्र, ड्या दिवशी डिलिव्हरी मिळणार होती त्या दिवशी डिलिव्हरी बॉयने ग्राहकाला तुमची ऑर्डर कंपनीकडून रद्द झाल्याचं सांगितलं. तुम्हाला कंपनीकडून परत पैसे मिळतील असंही सांगितलं. मात्र, त्या ग्राहकाला फोन डिलिव्हर झाला असा मेसेज आला. त्यानंतर त्या व्यक्तीला आपली फसवणूक झाल्याचं लक्षात आलं.

- Advertisement -

कंपनीने ऑर्डर रद्द केल्याचं खोटं सांगत मोबाईल परस्पर विकून टाकला. या प्रकरणी डिलिव्हरी बॉयला अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात पोलिसांनी माहिती देताना सांगितलं की, १९ तारखेला दक्षिण दिल्लीतल्या किडवई नगर भागात राहणाऱ्या ग्राहकाने फसवणूक झाल्याची तक्रार दाखल केली होती. आपण ऑर्डर केलेला मोबाईल देण्यासाठी १ ऑक्टोबरला दिल्लीतील किडवाई नगरमध्ये घरी डिलिव्हरी बॉय आला होता. त्यावेळी त्याने मला तुमच्या मोबाईलची ऑर्डर कंपनीने कॅन्सल केल्याचं सांगितलं. त्याचबरोबर कंपनी नंतर रिफंड देणार असल्याचं देखील सांगितलं, असं त्याने तक्रारीत म्हटलं आहे. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास करत त्या डिलिव्हरी बॉयला अटक केली. त्यानंतर त्याने विकलेला फोन धरमवीर नावाच्या व्यक्तीकडून जप्त करण्यात आला. जो त्याने चोरून या व्यक्तीला विकला होता. यानंतर चौकशीमध्ये त्याने आपल्याला पैशांची गरज असल्याने आपण असं केल्याच सांगितलं. डिलिव्हरी बॉय विरोधात फसवणुकीच्या गुन्ह्यासाठी ४२० कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


हेही वाचा – रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! ७८ दिवसांच्या पगाराएवढा मिळणार बोनस

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -