Sunday, June 11, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश Amazon मध्ये कॉस्ट कटिंगची दुसरी फेरी; 9 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

Amazon मध्ये कॉस्ट कटिंगची दुसरी फेरी; 9 हजार कर्मचाऱ्यांना मिळणार नारळ

Subscribe

जानेवारी महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या अ‍ॅमेझॉन या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे.

Amazon Layoff 2023: 2023 च्या सुरुवातीला अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता. अनेक मोठमोठ्या कंपन्या आपल्या कर्मचाऱ्याला कामावरून काढून टाकत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जानेवारी महिन्यात आपल्या कर्मचाऱ्यांना काढून टाकणाऱ्या अ‍ॅमेझॉन या कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा एकदा मोठा झटका दिला आहे. कंपनीने एक मोठी घोषणा केली आहे. येत्या काही आठवड्यात अ‍ॅमेझॉनमध्ये काम करणाऱ्या तब्बल 9 हजार कर्मचाऱ्यांना नोकरी गमवावी लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. कंपनीच्या या घोषणेनंतर कर्मचाऱ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण पाहायला मिळत आहे.

कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अँडी जॅसी यांनी अ‍ॅमेझॉनमधील दुसऱ्या फेरीच्या कॉस्ट कटिंगची माहिती एका मेमोमध्ये शेअर केली आहे. याबाबत माहिती देताना कंपनीचे सीईओ म्हणाले की, “कंपनीची वार्षिक नियोजन प्रक्रिया या महिन्यात पूर्ण होईल आणि त्यानंतर पुन्हा कॉस्ट कटिंगची दुसरी फेरी सुरू होईल. यासोबतच कंपनी काही मोक्याच्या क्षेत्रात नवीन भरतीही करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.” यापूर्वी जानेवारी 2023 मध्ये अ‍ॅमेझॉनने 18,000 लोकांना कंपनीतून काढून टाकले होते आणि आता पुन्हा एकदा कंपनीच्या 9 हजार कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.

- Advertisement -

अ‍ॅमेझॉन मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, AWS व्यतिरिक्त कॉस्ट कटिंगचा प्रभाव जाहिरात आणि ट्विचमध्ये दिसून येईल, म्हणजेच या विभागांमध्ये काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कॉस्ट कटिंगच्या दुसऱ्या फेरीचा परिणाम होईल. कंपनीच्या कॉस्ट कटिंगच्या निर्णयामागे आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी आणि खर्च कमी करण्यासाठी पावले उचलली जात आहेत. अ‍ॅमेझॉनने कॉस्ट कटिंगची दुसरी फेरी जाहीर केली आहे, ज्यामुळे अनेक विभागांमध्ये नोकऱ्या कमी होतील.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -