अॅमझॉनची कर्मचारी कपातीची घोषणा; अनेकांचे रोजगार धोक्यात

जगभरातील अनेक कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात करण्यास सुरू केली आहे. मायक्रोसॉफ्ट, ट्विटर मेटा यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले.

जगभरातील अनेक कंपन्यांनी आर्थिक मंदीमुळे कर्मचारी कपात करण्यास सुरू केली आहे. मायक्रोसॉफ्ट, ट्विटर मेटा यांसारख्या प्रसिद्ध कंपन्यांनी कर्मचारी कपात केली. यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना आपल्या रोजगारावर पाणी सोडावे लागले. अशातच आता ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉननेही मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला आहे. (amazon starts firing employees after meta twitter and Microsoft)

मिळालेल्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीनेही नोकर कपात करण्याचा मोठा निर्णय घेतला. शिवाय कंपनीने नवीन भरतीवरही तात्काळ बंदी घातली आहे. ॲमेझॉन कंपनीच्या आर्थिक परिस्थितीचे कारण देत सध्या भरती थांबवण्यात आली आहे. त्यानंतर 3700 हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून हटवण्यात येणार आहे.

आर्थिक मंदीमुळे ॲमेझॉन कंपनीने तोट्यात असलेल्या प्रक्रिया बंद करण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, अमेझॉन कंपनीच्या कर्मचारी कपातीच्या निर्णयामुळे रोबोटिक्स विभागातील कर्मचाऱ्यांची नोकरी धोक्यात आहे. ॲमेझॉनमध्ये काम करणाऱ्या सॉफ्टवेअर इंजिनिअर जेमी झांग याने लिंक्डइनवर याबाबत माहिती दिली आहे. शिवाय, एका माजी कर्मचाऱ्यानेही पोस्ट केली असून, यामध्ये संपूर्ण रोबोटिक्स विभागाला नोटीस देण्यात आली असून त्यांच्या नोकरी गदा येऊ शकते.

एका वृत्त वाहिनीच्या माहितीनुसार, ॲमेझॉन कंपनीने आपल्या काही फायदा नसलेल्या विभागांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीस बजावत दुसरीकडे नोकरी शोधण्यास सांगितले आहे.


हेही वाचा – पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यावरूनच ‘भारत जोडो यात्रे’चा प्रभाव जाणवतोय; जयराम रमेश यांचा टोला