घर ताज्या घडामोडी amazon summer sale 2022 : Amazon वर ४ मे पासून समर सेल,...

amazon summer sale 2022 : Amazon वर ४ मे पासून समर सेल, बंपर ऑफर्स

Subscribe

उन्हाच्या कडाक्यात खरेदीसाठी बाहेर जाण्याऐवजी घरातूनच आरामात मनासारखी खरेदी करण्याची ही उत्तम संधी आहे. अॅमेझॉनवर ४ मे पासून समर सेलला सुरूवात होणार आहे. या सेलमध्ये अनेक प्रकारच्या ऑफर्स आणि सवलती ग्राहकांना मिळणार आहेत.

या अॅमेझॉन मध्ये तुम्हाला बंपर डिस्काऊंट मिळेलच. याशिवाय, खास बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डांवर दुहेरी लाभ देखील मिळणार आहे. आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा आणि आरबीएल बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डावर तुम्ही १० टक्क्यांपर्यंतची अधिक बचत करू शकता.

- Advertisement -

लॅपटॉप, मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक डिव्हाईस घेण्याचा विचार करत असाल तर ही संधी अजिबात सोडू नका. फॅशनेबल कपडे आणि फुटवेअर यावर १९९ रुपयांपासून सुरू होणार आहे. पुरुषांसाठी तसेच women fashion wear वर ८० टक्क्यांपर्यंत डिस्काऊंट आहे. यामध्ये फॉर्मल, कॅज्युअल, पार्टी वेअर आणि रेग्युलर वेअरवर देखील डिस्काऊंट मिळणार आहे.

पुरुषांसाठी स्पोर्ट्स शूज, कॅज्युअल शूज, लोफर्स, सँडल, स्लीपर्स असे अनेक प्रकारचं फुटवेअर ८० टक्क्यांपर्यंतच्या डिस्काऊंटच्या किमतीत उपलब्ध आहे. तसेच महिलांच्या स्पोर्ट्स शूजवरही सवलती मिळणार आहेत.नवीन मोबाईल घ्यायचा असल्यास ग्राहकांची इच्छा देखील आता सहज पूर्ण होऊ शकते. यामध्ये मोबाईलवर ४० टक्क्यांपर्यंतची सवलत मिळणार आहे. या सेलचं वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये १६ नवे स्मार्टफोन आणि अॅक्सेसरिज लाँन्च करण्यात येणार आहेत. या सेलमध्ये ग्राहकांना Samsung, Apple, iQOO, OnePlus, Mi असे अनेक ब्रँड्स मिळणार आहेत.


- Advertisement -

हेही वाचा : परप्रांतीयांकडून राज्यातील कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा कट, गुप्तचर विभागाकडून अलर्ट जारी


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -