Jeff Bezos : Amazon चे संस्थापक जेफ बेजोस निघाले अंतराळ प्रवासाला, २० जुलैला पोहणार चंद्रावर

तिसरी सीट राखीव ठेवली असून त्यासाठी ऑनलाईन बोली

Amazon's billionaire ceo jeff bezos to fly to space with brother mark on a blue origin flight on july 20
Jeff Bezos : अॅमेझॉनचे संस्थापक जेफ बेजोस निघाले अंतराळ प्रवासाला, २० जुलैला पोहणार चंद्रावर

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत सर्वोच्च स्थानी असणारे Amazon चे संस्थापक , उद्योगपती जेफ बेजोस अंतराळ प्रवासाला निघाले आहेत. आपली रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनने ते पहिल्या मानवी अंतराळ उड्डाणातून अंतराळ प्रवास करणार आहे. बेजोस यांच्यासह त्यांचा भाऊ आणि एक जण सोबत असणार आहे. जेफ बेजोस २० जुलै रोजी पहिल्या अंतराळ प्रवासाला निघणार आहे. या यानातून टेक्सासमधून अंतराळात थोड्या वेळासाठी प्रवास केला जाणार आहे.

तिसरी सीट राखीव ठेवली असून त्यासाठी ऑनलाईन बोली

या अंतराळ प्रवासासाठी तिसरी सीट राखीव ठेवली असून त्यासाठी ऑनलाईन बोली लावली जात आहे. १२ जून रोजी ही बोली संपणार असल्याने त्यानंतर स्पष्ट होईल जेफ आणि त्यांच्या भावासह अंतराळात जाणारा तिसरा व्यक्ती कोण असणार आहे. या बोलीसाठी करेंड बीडिंग २,८००,००० डॉलर आहे. रॉकेट कंपनी ब्लू ओरिजिनची हा पहिला अंतराळातील प्रवास आहे. या लिलावाच्या बोलीतून मिळालेली रक्कम ब्लू ओरिजन फाउंडेशनला दान दिलं जाईल. ज्याचा उपयोग भविष्यात अंतराळातील संशोधनासाठी करण्यात येणार आहे.

अंतराळ प्रवास एकूण १० मिनिटपर्यंत असणार

जेफ यांचा हा अंतराळ प्रवास एकूण १० मिनिटपर्यंत असणार आहे. ज्यात चार मिनिटासाठी कॉर्मन लाइनच्या वर जाईल. कॉर्नन रेखा पृथ्वीच्या वायुमंडल आणि अंतराळ दरम्यान मान्यताप्राप्त सीमा आहे. म्हणजेच ही एक पृथ्वी आणि वायूमंडल आणि बाह्य अंतरिक्ष या दरम्यानची सीमा बॉर्डर लाइन आहे.

फक्त ५ वर्षाचा तेव्हापासून माझे अंतराळात जाण्याचे स्वप्न

याविषयी जेफ बेजोस यांनी एक इंस्टाग्रामवर पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले की, “पृथ्वीला अंतराळातून पाहणं, तुम्हाला बदलून टाकतं. या ग्रहासोबतचं नातं तुमच आयुष्य बदलते. मला या उड्डाणातून प्रवास करण्याची इच्छा आहे. कारण ही एक अशी गोष्ट आहे, जी मला माझ्या आयुष्यात करायची होती. हे फार रोमांचक असणार आहे. हे माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. मी फक्त ५ वर्षाचा तेव्हापासून माझे अंतराळात जाण्याचे स्वप्न होते. २० जुलै रोजी मी माझ्या भावासोबत हे स्वप्न साकार करणार आहे आणि हे माझ्या चांगल्या मित्रासोत सर्वात खास क्षण असणार आहे.यानंतर जेफ बेजोस यांनी Amazon.com चे सीईओ पद सोडनंतर जवळपास दोन आठवड्यानंतर म्हणजेच २० जुलै रोजी या अंतराळ प्रवासाची घोषणा केली.


EPFO च्या महत्त्वाच्या नियमांत मोठे बदल, कर्मचाऱ्यांनी लवकर अपडेट करा अकाउंट