घरताज्या घडामोडी#RafaleInIndia: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेलचं संस्कृत श्लोक ट्विट करत केलं स्वागत

#RafaleInIndia: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राफेलचं संस्कृत श्लोक ट्विट करत केलं स्वागत

Subscribe

जगातील सर्वात शक्तिशाली लढाऊ विमानांपैकी एक राफेल विमान आहे. आज पाच राफेल फायटर विमानांचे लँडिग भारतामध्ये झाले आहे. सोमवारी फ्रान्समधून उड्डाण घेतल्यानंतर आज राफेलची पाच विमाने अंबाला एअर बेसवर सुरक्षित उतरली आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून राफेलच्या विमानांचे स्वागत केले आहे. विशेष म्हणजे मोदींनी संस्कृत श्लोक ट्विट करत राफेल विमानांचे स्वागत केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘राष्ट्ररक्षासमं पुण्यं, राष्ट्ररक्षासमं व्रतम्, राष्ट्ररक्षासमं यज्ञो, दृष्टो नैव च नैव च।। नभः स्पृशं दीप्तम् स्वागतम्!’

- Advertisement -

बऱ्याच काळापासून राफेल विमानांची चर्चा होती. या शक्तिशाली लढाऊ विमानांमुळे भारतीय हवाई दलात बळ कैक पटीने वाढले आहे. फ्रान्सबरोबर ३६ राफेल विमाने खरेदी करण्याचा करार २०१६ साली नरेंद्र मोदी सरकारच्या पहिला कार्यकाळात झाला होता. त्यानंतर काँग्रेसने २०१९च्या लोकसभा निवडणुकीच्या आधी राफेल खरेदीच्या मुद्द्यावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राफेलच्या व्यवहारामध्ये भ्रष्टाचार करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने भाजप सरकारवर केला होता. हे प्रकरण सुप्रीम कोर्टात गेले होते. पण सुप्रीम कोर्टाकडून याप्रकरणी सरकारला क्लीन चीट मिळाले.

- Advertisement -

आज या राफेल विमानांचे आगमन झाल्यानंतर काँग्रेसने देखील स्वागत केले आहे. शिवाय हवाई दलाच्या जवानांचे अभिनंदन केले असून सरकारला काही प्रश्न विचारण्याचे देशवासीयांना आवाहन देखील केले आहे.


हेही वाचा – Rafale Fighter Jet : ‘राफेलमुळे हवाई दलाची ताकद वाढेल पण ती गेमचेंजर ठरणार नाही’


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -