घरताज्या घडामोडीAmbani security scare : महाराष्ट्र ATS ची गाडी खूपच वेगाने धावतेय -...

Ambani security scare : महाराष्ट्र ATS ची गाडी खूपच वेगाने धावतेय – रवीशंकर प्रसाद

Subscribe

प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फोटकांसह सापडलेल्या स्कॉर्पिओ प्रकरणाचा तपास हा सध्या नॅशनल इनवेस्टीगेशन एजन्सीमार्फत सुरू आहे. पण या स्कॉर्पिओचा मालक मनसुख हिरेनच्या मृत्यू प्रकरणात मात्र महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाची गाडी खूपच वेगाने धावत आहे. एनआयएला असलेल्या अधिकारानुसार स्फोटकांशी संबंधित कोणत्याही प्रकरणात तपास करण्याचा अधिकार हा एनआयएला आहे. अशावेळी या प्रकरणाची एनआयएकडून व्यापक चौकशी का होऊ नये ? असा सवाल भाजप नेते रविशंकर प्रसाद यांनी केला आहे. जिलेटीनच्या काड्यांचा संबंध हा इतर राज्यातही दिसून येत आहे. अशावेळी या प्रकरणात मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यूची एनआयएची चौकशी का थांबवली जाते ? त्यामुळेच संशय घेण्यासाठी वाव आहे, असेही ते म्हणाले. स्फोटक सापडण्याचे प्रकरण, मनसुख हिरेन यांचा मृत्यू आणि पोलिस बदल्यांचे प्रकरण या सगळ्या गोष्टींमुळे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्रात सत्ता चालवण्याचा नैतिक अधिकार गमावला असल्याची टीका रविशंकर प्रसाद यांनी केली.

आम्ही या संपुर्ण प्रकरणात फक्त खरी माहिती ही जनतेसमोर आणत आहोत. पण संपुर्ण प्रकरणात जेष्ठ नेते शरद पवार यांच्या नेतृत्वावरही प्रश्न उपस्थित होतात असेही ते म्हणाले. शरद पवार यांची अशी काय मजबुरी आहे ज्यामुळे ते अनिल देशमुख यांचे गृहमंत्री पद इतके वाचवत आहेत असाही सवाल त्यांनी केला. या संपुर्ण प्रकरणामध्ये अनिल देशमुख यांचा राजीनामा शरद पवारांनी घेणे अपेक्षित असल्याचेही ते यावेळी म्हणाले. तसेच महाराष्ट्राचे सध्याचे नेतृत्व हे राज्य सरकारचा कारभार चालवण्यासाठी सक्षम नाही असाही आरोप त्यांनी यावेळी केला. रवीशंकर प्रसाद म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात सरकार चालवण्याचा नैतिक अधिकार गमावला आहे, असेही ते म्हणाले.

- Advertisement -

पोलिस दलातील बदल्यांचा अहवाल हा रश्मी शुक्ला या अधिकाऱ्याकडून पोलिस महासंचालक सुबोध जयस्वाल यांच्याकडे पाठवला गेला. सुबोध जयस्वाल यांनी हा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला. पण या अहवालावर कारवाई करण्याएवजी या दोन्ही पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. आता दोघेही अधिकारी हे सेंट्रेल डेप्युटेशनवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्याअंतर्गत कार्यरत आहेत. त्यामुळेच इतक्या मोठ्या दर्जाचे अधिकारी हे महाराष्ट्र सोडून जातात यापेक्षा महाराष्ट्राचे दुर्भाग्य नाही असेही ते म्हणाले.


 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -