कर्नाटकात टोल नाक्यावर रुग्णवाहिकेचा भीषण अपघात; चार जणांचा मृत्यू

एका रुग्णवाहिका चालकाचा ताबा सुटल्याने रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

एका रुग्णवाहिका चालकाचा ताबा सुटल्याने रुग्णवाहिकेचा भीषण अपघात झाल्याची धक्कादायक घटना कर्नाटकात घडली आहे. बुधवारी दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.

कर्नाटक राज्याच्या उडुपी जिल्ह्यातील बयंदूर येथील शिरूर टोल नाक्यावर हा अपघात झाला. या अपघातात रुग्णवाहिकेतील तीन प्रवासी आणि चालक यांचा मृत्यू झाला आहे. तसेच, तर चार जण जखमी झाले आहेत.

कर्नाटकात पावसाने जोर धरल्याने संपूर्ण रस्ते ओले झाले होते. त्यामुळे रुग्णवाहिकेच्या चालकाला ओल्या रस्तांवर ताबा मिळवता आला नाही. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

या व्हायरल व्हिडिओमध्ये टोल नाक्यावर असलेल्या कर्मचाऱ्याला रुग्णवाहिका भरधाव वेगाने येत असतनाना दिसली. त्यानंतर त्याने टोल नाक्यावरील बॅरिकेट्स बाजूला केले. त्यावेळी रुग्णवाहिका चालकानेही ब्रेक लावण्याचा प्रयत्न केला. परंतु, रस्ता ओला असल्याने ब्रेक लागत नव्हता. शिवाय, बूम बॅरिअर काढण्यातही वेळ गेला त्यामुळे रुग्णवाहिकेचा अपघात झाला.

दरम्यान, मुसळधार पावसाने रस्ते ओले झाल्याने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनांनी सुरक्षेच्या दृष्टीने आपल्या वाहनांचा वेग कमी केला होता.


हेही वाचा – ब्रिटेनमध्ये उष्णतेची लाट; नागरिकांचे जनजीवन विस्कळीत