न्यू ऑर्लियंस : जगभरात मंगळवारी रात्री नवीन वर्षाच्या स्वागताची तयारी आणि जल्लोष सुरू होता. अमेरिकेत मात्र, या नववर्ष स्वागताला गालबोट लागले आहे. येथील न्यू ऑर्लियन्स शहरात नवीन वर्षाचे स्वागत करत असलेल्या गर्दीमध्ये एकाने थेट ट्रक घुसवला. या हल्ल्यात 12 जणांचा मृत्यू झाला तर 30 जण जखमी झाले. हा दहशतवादी हल्ला असल्याचे समजते. आमच्या शहरावर दहशतवादी हल्ला झाल्याची प्रतिक्रिया न्यू ऑर्लियन्सच्या महापौर लाटोया कैंट्रेल यांनी यावेळी दिली. दरम्यान, या घटनेचा तपास करत असलेल्या एफबीआयने हा दहशतवादी हल्ला नसल्याचे म्हटले आहे. (america 12 people killed over 30 injured after high speed car rams into crowd in new orleans)
अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स कॅनल आणि बॉर्बन स्ट्रीट येथे बुधवारी नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या गर्दीत अज्ञात व्यक्तीने ट्रक घुसवला. यात 12 जणांचा मृत्यू तर 30 जखमी झाले. शहरातील आपत्कालीन परिस्थिती हाताळणारी यंत्रणा नोला रेडीने ही माहिती दिली. नोला रेडीने लोकांना या भागापासून दूर राहण्यास सांगितले आहे.
न्यू ऑर्लियन्सच्या महापौर कैंट्रेल म्हणाल्या की, आमच्या शहरावर दहशतवादी हल्ला झाल्याची आमची माहिती आहे. या घटनेचा तपास अजूनही सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक वेळेनुसार पहाटे सव्वा तीनच्या सुमारास ही घटना घडली. न्यू ऑर्लियन्सच्या एका ट्रकने प्रसिद्ध बॉर्बन स्ट्रीट भागात नवीन वर्षाचे स्वागत करणाऱ्या गर्दीला धडक दिली. 30 जखमींना पाच स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गर्दीत जाणीवपूर्वक ट्रक घालणाऱ्या या चालकाचा माणसं मरावी हाच हेतू असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. या गाडीच्या चालकाने अधिकाऱ्यांवर देखील गोळ्या झाडल्या. दोन अधिकाऱ्यांना गोळ्या लागल्या असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणाचा तपास एफबीआय करत असून घटनास्थळी आईडी सापडल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचाही तपास सुरू आहे.
हेही वाचा – Delhi Election 2025: भाजपच्या चुकीच्या कामांना संघाचे समर्थन…केजरीवालांचा भागवतांना थेट सवाल