घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटनोकरी नाही, मायदेशी येण्यासाठी मार्ग नाही.. अमेरिकेतील भारतीय संकटात!

नोकरी नाही, मायदेशी येण्यासाठी मार्ग नाही.. अमेरिकेतील भारतीय संकटात!

Subscribe

अमेरिकेत एच १ बी व्हिसावर जे अमेरिकेत स्थायिक झाले आहेत किंव ज्यांची मुलं अमेरिकेत जन्माला आली आहेत असे भारतीय मोठ्या संकटात सापडले आहेत.

अमेरिकेमध्ये एच १ बी या कामासाठीच्या व्हिसा किंवा ग्रीन कार्ड असलेले भारतीय संकटात आडकले आहेत. कारण अमेरिकेत कोरोनाचा कहर झाला आहे. दररोज हजारो लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे भारतीयांच्या नोकऱ्या गेल्या आहेत, अनेकांच्या नोकऱ्या संकटात आहेत.

अमेरिकेत एच १ बी व्हिसावर जे अमेरिकेत स्थायिक झाले आहेत किंव ज्यांची मुलं अमेरिकेत जन्माला आली आहेत असे भारतीय मोठ्या संकटात सापडले आहेत. जगभरात विमान वाहतूक बंद ठेवण्यात आली आहे. यामुळे भारताने परदेशात अडकलेल्या नागरिकांना मायदेशात आणण्यासाठी एअर इंडिया आणि नेव्हीकडून वंदे भार मोहिम सुरू करण्यात आली. यानुसार एअर इंडियाची विमानं अमेरिकेत गेली आहेत.

- Advertisement -

भारत सरकारने जारी केलेल्या नियमांमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. यानुसार परदेशी नागरिकांचे व्हिसा आणि ओसीआय कार्डला आंतराष्ट्रीय प्रवास बंदीमुळे रद्द करण्यात आले आहे. याचा फटका न्यू जर्सीच्या एका कुटुंबाला बसला आहे. या कुटुंबाची नोकरी गेली आहे. कायद्यानुसार त्यांना ६० दिवसात भारतात परतावे लागणार आहे. मात्र त्यांची दोन्ही मुलं अमेरिकेचे नागरिक आहेत. सोमवारी ते परतण्यासाठी नेवार्क विमानतळावर आले होते. मात्र एअर इंडियाने त्यांना तिकीट देण्यास नकार दिला.


हे ही वाचा – मोदींनी जाहीर केलं २० लाख कोटींच आर्थिक पॅकेज, लॉकडाऊन ४ची घोषणा!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -