घर देश-विदेश कॅलिफोर्निया गुरुद्वारा गोळीबार प्रकरणात १७ जणांना अटक, एके ४७ आणि मशीनगन जप्त

कॅलिफोर्निया गुरुद्वारा गोळीबार प्रकरणात १७ जणांना अटक, एके ४७ आणि मशीनगन जप्त

Subscribe

कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल रॉब बोन्टा, युबा शहर पोलिस प्रमुख ब्रायन बेकर आणि सटर काउंटी जिल्हा ऍटर्नी जेनिफर डुप्री यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

California Gurdwara Shootings: कॅलिफोर्नियातील सॅक्रामेंटो काउंटीमधील गुरुद्वारामध्ये झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी १७ जणांना अटक केली आहे. त्याचबरोबर २० हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. पोलिसांनी एके-47, हातकड्या आणि एक मशीनगन सारखी शस्त्रे जप्त केली.

कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल रॉब बोन्टा, युबा शहर पोलिस प्रमुख ब्रायन बेकर आणि सटर काउंटी जिल्हा ऍटर्नी जेनिफर डुप्री यांनी आज संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. १६ एप्रिल रोजी नॉर्दर्न कॅलिफोर्नियामध्ये २० ठिकाणी सर्च वॉरंट जारी करून मोठ्या प्रमाणावर सर्च ऑपरेशन करण्यात आले होते. या १७ आरोपींपैकी बहुतांश स्थानिक शीख समुदायाचे सदस्य होते. सटर काउंटी डिस्ट्रिक्ट अॅटर्नी जेनिफर डुप्रे यांनी सांगितले की, अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन माफिया सदस्य आहेत जे भारतात एकापेक्षा जास्त जास्त खुन प्रकरणात वॉन्टेड हवे आहेत.

- Advertisement -

सर्व आरोपी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे
कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल म्हणाले की, अटक करण्यात आलेले सदस्य प्रतिस्पर्धी सिंडिकेट टोळीशी संबंधित होते. ते सटर, सॅक्रामेंटो, सॅन जोक्विन, सोलानो, योलो आणि मर्सिड काउंटीमधील पाच खूनांसह असंख्य हिंसक गुन्हे आणि गोळीबार प्रकरणात त्यांचा सहभाग आहे. या गटांचे सदस्य 27 ऑगस्ट 2022 रोजी स्टॉकटन शीख मंदिरात झालेल्या गोळीबारात आणि 23 मार्च 2023 रोजी सॅक्रामेंटो शीख मंदिरात झालेल्या गोळीबारात देखील सहभागी होते.

कुटुंबाला काळजी करण्याची गरज नाही
कॅलिफोर्नियाचे ऍटर्नी जनरल रॉब बोन्टा म्हणाले की, कुटुंबाला काळजी करण्याची काहीच गरज नाही. टोळीतील संशयित सदस्य आणि त्यांच्या साथीदारांना आम्ही तुरुंगात टाकत आहोत,

- Advertisement -

शीख सोसायटीच्या मंदिरात दुपारी अडीच वाजता ही घटना घडली
शीख मंदिरात गोळीबाराची घटना गेल्या महिन्यात मार्च महिन्यात दुपारी अडीचच्या सुमारास घडली होती. हे शूटिंग गुरुद्वारा सॅक्रामेंटो शीख सोसायटी मंदिरात झाले. सॅक्रामेंटो काउंटी शेरीफ कार्यालयाचे प्रवक्ते अमर गांधी म्हणाले की, गोळीबाराचा द्वेषाच्या गुन्ह्याशी संबंध नाही आणि ही घटना एकमेकांना ओळखत असलेल्या दोन लोकांमधील गोळीबाराची आहे.

- Advertisment -