घरCORONA UPDATECoronaVirus: अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८५ हजारांवर

CoronaVirus: अमेरिकेत कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडा ८५ हजारांवर

Subscribe

कोरोना विषाणूने सर्वाधिक हाहाकार हा जगातील बलाढ्य राष्ट्र असलेल्या अमेरिकेत माजवला आहे. अमेरिकेत आतापर्यंत कोरोनामुळे ८५ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. तर १४ लाख लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या २४ तासांत अमेरिकेमध्ये १ हजार ७५४ जणांना या आजारामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे अमेरिकेतील मृत्यूचा आकडा हा ८५ हजार ८१३ इतका झाला आहे. हा जगभरात सर्वाधिक मृत्यूदर आहे. एकीकडे अमेरिकेत कोरोना व्हायरसचा प्रकोप वाढत असून दुसरीकडे अमेरिकी सरकार चीनवर टीकास्त्रही सोडत आहे. परराष्ट्र मंत्री माईक पोम्पियो यांच्या वतीने पुन्हा एकदा चीनवर टीका केल्याचे समजते.

हेही वाचा – ‘वंदे भारत मिशन’चा दुसरा टप्पा १७ मेपासून सुरू; मोहीम १८ दिवस चालणार

- Advertisement -

परराष्ट्र मंत्र्यांनी चीनला सुनावले खडेबोल 

माइक पोम्पियो यांनी ट्विटरच्या माध्यमातून चीनला खडेबोल सुनावले आहेत. त्यांनी म्हटले आहे की, चीन किंवा त्यांच्या साथीदारांनी आता कोरोना व्हायरससंबंधीची लस बनवण्याचे संशोधन चोरण्याकडे लक्ष देऊ नये. चीनने तातडीने या खुरापती काढणे थांबवावे, असे कडक शब्दात पोम्पियो यांनी चीनची कान उघडणी केली आहे. तसेच चीनमधूनच कोरोना व्हायरसची उत्पत्ती झाली आहे. त्यामुळे जगभरात हा जीवघेणा व्हायरस पसरला आहे. चीनने त्यावेळी ही बाब लपवली. वेळीच त्यांनी जगासमोर व्हायरसची माहिती दिली असती तर आज जगाची अशी परिस्थिती नसती, असा पुनरोच्चार त्यांनी दुसऱ्या एका ट्विटमध्ये केला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -