Friday, September 17, 2021
27 C
Mumbai
घर CORONA UPDATE जागतिक कोरोना अपडेट अमेरिकेत Delta Variantचा कहर! प्रत्येक ५५ सेकंदाला एकाचा मृत्यू, तर प्रत्येकी ६०...

अमेरिकेत Delta Variantचा कहर! प्रत्येक ५५ सेकंदाला एकाचा मृत्यू, तर प्रत्येकी ६० सेकंदाला १११ लोकं कोरोनाबाधित

Related Story

- Advertisement -

अमेरिकेत डेल्टा व्हेरियंटचा (America Delta Variant) कहर सुरू आहे. कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रसारामुळे सध्या अमेरिकेची परिस्थिती सुरुवातीपेक्षा बिकट झाली आहे. गेल्या आठ महिन्यापेक्षा सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण आता अमेरिकेत आढळत आहेत. अमेरिकेत प्रत्येक ५५ मिनिटात एका कोरोनाबाधिताचा मृत्यू होत आहे. तर प्रत्येकी ६० सेकंदामध्ये १११ लोकं कोरोनाबाधित आढळत आहेत. याचाच अर्थ प्रत्येक सेकंदा दोन कोरोनाबाधित रुग्ण समोर येत आहे. त्यामुळेच अमेरिकेतील कोरोनाबाधितांची संख्या ४ कोटी पार झाली आहे. आतापर्यंत यापैकी ६.६२ लाखांहून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेत रुग्णांची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे, ज्यामुळे रुग्णालय पूर्णपणे भरले आहे.

अमेरिकेतील या राज्यांमधील परिस्थिती भयावह

अमेरिकेतील अनेक राज्यांमध्ये कोरोनाने हाहाकार घातला आहे. हवाई, व्हरमाँट, टेक्सास, व्हर्जिन आयलँड अलास्कार, ऊटाह, नेवादा, ओरेगन, जॉर्जिया आणि नॉर्थ कॅरोलिनामध्ये २०२०च्या तुलनेत ऑगस्ट २०२१मध्ये अधिक मृत्यू झाले आहेत. ॲरिझोना, ओक्लाहामा, वेस्ट व्हर्जिनिया, केंटुकी, व्हर्जिनिया, कॅलिफोर्निया आणि अलाबामामध्ये परिस्थितीत खूप बिकट आहे.

ऑक्सिजनचा तुटवडा पडण्याची शक्यता

- Advertisement -

अमेरिकेत ऑगस्ट महिन्यात ४२ लाखांहून अधिक रुग्णांची नोंद झाली. तर कोरोनामुळे मृत्यूची होणारी संख्या जुलै महिन्याच्या तुलनेत तीन टक्क्यांहून अधिक वाढली आहे. रिपब्लिकन राज्यांमध्ये मृत्यूची संख्या गेल्या वर्षापासून अधिक आहे. त्यामुळे अमेरिकेत आता ऑक्सिजनचा तुटवडा पडत असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सहा महिन्यात दीड कोटी लसीचे डोस वाया

जरी अमेरिकेत कोरोनाचा कहर वाढत असला तरी लसीकरण देखील तितक्याच वेगाने सुरू आहे. परंतु यादरम्यान एक नकारात्मक बातमी समोर आली आहे. गेल्या सहा महिन्यात जवळपास अमेरिकेत दीड कोटी डोस वाया गेले आहेत. या वाया गेलेल्या डोसेमुळे जगातील २० हून अधिक छोट्या देशाचे संपूर्ण लोकसंख्यचे लसीकरण झाले असते. याबाबतची माहिती अमेरिकन फार्मेसी कंपन्या आणि राज्य सरकारद्वारे जारी केलेल्या आकड्यांमधून समोर आली आहे.


- Advertisement -

हेही वाचा – CoronaVirus जुनाच! 21 वर्षांपूर्वीही होता अस्तित्वात; संशोधकांचा दावा


 

- Advertisement -