घरCORONA UPDATEअमेरिकेची भारताकडे मलेरियावरील हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची मागणी

अमेरिकेची भारताकडे मलेरियावरील हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषधाची मागणी

Subscribe

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध पुरवण्याची मागणी केली आहे.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हायड्रॉक्सीक्लोरोक्विन औषध पुरवण्याची मागणी केली आहे. शनिवारी सकाळी पंतप्रधान मोदी यांच्याशी आपण फोनवर बोललो, तेंव्हा आपण त्यांना अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्वीन औषध पुरवावे, अशी विनंती केली आहे, अशी माहिती स्वतः ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस येथे त्यांच्या नियमित पत्रकार परिषदेत बोलताना दिली.

भारताच्या परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) २५ मार्च रोजी या औषधाच्या निर्यातीवर बंदी घातली. तथापि, डीजीएफटीने म्हटले होते की, मानवतेच्या आधारे विचार करून काही प्रमाणात निर्यात करण्यास परवानगी दिली जाऊ शकते. अमेरिकेत कोरोना विषाणूचा जगभरात ३ लाखांहून अधिक लोकांना संसर्ग झाला असून ८ हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. अमेरिका सर्वात जास्त प्रभावित देश म्हणून उदयास आला आहे. या विषाणूचा आजपर्यंत कोणताही उपचार आढळलेला नाही.

- Advertisement -

न्यूयॉर्कमध्ये १५०० कोरोनाबाधितांवर केला वापर

या विषाणूविरूद्ध लस किंवा अचूक उपचार शोधण्यासाठी अमेरिका आणि जगातील शास्त्रज्ञ अहोरात्र काम करत आहेत. जेणेकरून लोकांचे जीव वाचू शकतील. या महामारीमुळे आतापर्यंत जगात ६४ हजाराहून अधिक लोक मरण पावले आहेत. त्याचवेळी ११ लाख ५३ हजार १४२ जण संक्रमित आहेत. दरम्यान, ट्रम्प प्रशासन काही प्राथमिक निकालांच्या आधारे कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी हायड्रॉक्सीक्लोरोक्विन वापरण्यावर भर देत आहे. हे औषध मलेरियाच्या उपचारांमध्ये अनेक दशकांपासून वापरले जाते. गेल्या शनिवारी अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाच्या त्वरित मान्यता मिळाल्यामुळे, न्यूयॉर्कमध्ये अंदाजे १ हजार ५०० कोरोनाबाधित रूग्णांवर मलेरियाचे औषध वापरुन इतर काही औषधांच्या संयोगाने उपचार केले जात आहेत.

ट्रम्प यांच्या मते, या औषधाचे सकारात्मक परिणाम आहेत. जर ते यशस्वी झाले तर ते स्वर्गातील भेटीसारखे असेल. हायड्रॉक्सीक्लोरोक्विन कोरोना विषाणूच्या उपचारात यशस्वी औषध असेल या आशेने अमेरिकेने आधीच सुमारे २९ लाख डोस साठवले आहेत. या संदर्भात ट्रम्प यांनी मोदींना अमेरिकेला हायड्रॉक्सीक्लोरोक्विनचे कोट्यवधी डोस देण्याची विनंती केली आहे. त्यामुळे आता भारतही हे औषध मोठ्या प्रमाणात तयार करत आहेत.

- Advertisement -

हेही वाचा – कोरोनाच्या आव्हानासाठी पंतप्रधानांची सर्व पक्षीय नेत्यांशी चर्चा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -