घरदेश-विदेशअलास्कामध्ये 8.2 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचे धक्के

अलास्कामध्ये 8.2 रिश्टर स्केल तीव्र भूकंपाचे धक्के

Subscribe

यूएस जियोलॉजिकल सर्वेने (USGS) भूकंपासंबधीत संपुर्ण माहिती दिली आहे.

अमेरिका मधील अलास्का प्रायद्वीपमध्ये बुधवारी रात्री तीव्र भूकंप झाला आल्याची माहिती समोर येत आहे. या भूकंपाची तीव्रता 8.2 रेक्टर स्केल इतकी होती. यामुळे नागरिकांना सुनामी येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. यूएस जियोलॉजिकल सर्वेने (USGS) भूकंपासंबधीत संपुर्ण माहिती दिली आहे. रात्री 11 वाजून 15 मिनिंटानी 29 मील जमिनीखाली भूकंपाचे झटके जाणवले आहेत. तसेच याचा परिणाम केंद्रापासून फार दूर पर्यंत झाला आहे. USGS मते नंतर पुन्हा दोन झटके आले ज्याची तीव्रता 6.2 आणि 5.6 रिश्टर स्केल इतकी होती. तसेच गेल्या सात दिवसांपासून या विभागात 100 मील परिसरामध्ये 3 रिश्टर स्केलपेक्षा जास्त मोठा भूकंप आला नाहीये. या भूकंपानंतर दक्षिण अलास्का,अलास्का प्रायद्वीप,Aleutian टापूवर सुनामी येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. माहितीनुसार भूकंप जमिनीच्या खोलवर परिणाम झाल्याने फार काही नुकसान झाले नाही. तसेच NWS Pacific Tsunami Warning Centerने प्रशांत महासागराच्या तटावर सुनामी येणार असल्यीचे संकेत देण्यात आले आहेत.

- Advertisement -

या व्यतीरिक्त गुआम आणि हवाईमध्ये सतर्कतेचा इशार देण्यात आला आहे. नारिकांना समुद्र किनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.अलास्का Pacific Ring of Fire मध्ये येतो सीस्मिक ऐक्टिविटी मध्ये खूप सक्रिय मानले जाते. यापुर्वी मार्च 1964 साली उत्तरी अमेरिकेचा सर्वात विनाशकारी भूकंप आला होता त्याची तीव्रता रिश्टर स्केल 9.2 इतकी होती.


हे हि वाचा – Friendship day 2021: फ्रेंडशिप डे कधी आहे?,जाणून घ्या फ्रेंडशिप डे ची तारीख,इतिहास आणि माहिती

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -