घरदेश-विदेशएलन मस्क ट्विटरच्या सीईओपदाचा देणार राजीनामा!

एलन मस्क ट्विटरच्या सीईओपदाचा देणार राजीनामा!

Subscribe

गेल्या काही दिवसांपासून ट्विटरमध्ये अनेक धोरणात्मक बदल केले जात आहेत. अशात ट्विटरचे सीईओ एलन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे. एलन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा देण्याबाबत एक ट्विट केलं होतं. ज्यात त्यांनी राजीनामा देण्यासंदर्भात प्रश्न केला आहे. मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरवर एक पोल घेतला होता. यात लाखो युजर्सना, मी ट्विटरच्या प्रमुख पदावरून पायउतार व्हावे का? असा प्रश्न विचारला.

मस्क यांनी या ट्विटरच्या पोलमध्ये युजर्सला सहभागी होण्याचे आवाहन केले होते. मस्क यांनी या पोलच्या माध्यमातून ट्विटरच्या प्रमुखपदाचा राजीनामा द्यायचा का, असा प्रश्न विचारला होता. यासोबतच मस्क यांनी मतदानाच्या निकालांबाबतही चर्चा केली आहे.

- Advertisement -

मस्कने आणखी एका ट्विटमध्ये ट्विटरमधील मोठ्या बदलांबद्दलही सांगितले. मोठ्या धोरणात्मक बदलांसाठीही मतदान होणार आहे. मी माफी मागतो, असे पुन्हा होणार नाही. असे म्हटले होते. तिसऱ्या ट्विटमध्ये त्यांनी म्हटले की, तुम्हाला काय हवे आहे त्याबद्दल तुम्ही निश्चित राहा, कारण तुम्हाला ते मिळू शकते. फेसबुक, इंस्टाग्राम आणि मास्टोडॉनसह विशिष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील इतर अकाऊंटचा प्रचार करण्यासाठी वापरल्या जाणार्‍या अकाऊंटवर बंदी घालण्यात येणार असल्याची रविवारी झालेल्या घोषणेनंतर सांगितले आहे.

- Advertisement -

मस्क यांनी यापूर्वी सांगितले होते की, आमचे अनेक युजर्स इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहेत. आम्ही यापुढे Twitter वर विशिष्ट सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या विनामूल्य जाहिरातीला अनुमती देणार नाही. ट्विटरने सांगितले की, ते अद्याप कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरून सामग्रीच्या क्रॉस-पोस्टिंगला परवानगी देते.


भारताचं वास्तव बदलण्याची जबाबदारी तरुणांची, नारायण मूर्तींचा सल्ला

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -