घरदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प यांचा पासपोर्ट चोरीला! एफबीआयवर केले 'हे' आरोप

डोनाल्ड ट्रम्प यांचा पासपोर्ट चोरीला! एफबीआयवर केले ‘हे’ आरोप

Subscribe

अमेरिकेचे माजी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पासपोर्ट चोरीला गेल्याचे म्हटले आहे. ट्रम्प यांनी याप्रकरणी फेडरल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशनवर (FBI) आरोप केले आहेत. यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, त्यांच्या निवासस्थानावर अलीकडे एजन्सीने छापेमारी केली, यात त्यांचा पोसपोर्ट चोरीला गेला आहे. मार-ए-लागो मालमत्तेच्या तपासात माझे तीन पासपोर्ट (एक कालबाह्य झालेले) चोरीला गेले आहेत.

ट्रम्प यांनी सोमवारी त्यांनी सह-स्थापित ट्रुथ सोशल नेटवर्कला पत्र लिहून आरोप केले. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी या पत्रात लिहिले की, हा राजकीय प्रतिस्पर्ध्यावरील हल्ला आहे आणि जो आपल्या देशात यापूर्वी कधीही पाहिला नव्हता. हे सर्व काही षडयंत्रातून होत असल्याचे त्यांनी सांगितले.

- Advertisement -

जप्त केलेल्या वस्तूंच्या यादीत पासपोर्ट नाही

अमेरिकेतील फ्लोरिडा राज्यातील त्यांच्या मालमत्तेची झडती घेतल्यानंतर एका आठवड्यानंतर ट्रम्प याबद्दल का बोलले हे अद्याप स्पष्ट झाले नाही. व्हाईट हाऊसमधून वर्गीकृत कागदपत्रे घेऊन ट्रम्प यांनी हेरगिरी कायदा आणि इतर कायद्यांचे उल्लंघन केले असावे, असा संशय या छापेमारीमुळे निर्माण झाला. फ्लोरिडा न्यायालयाने यूएस ऍटर्नी जनरल मेरिक गारलँड यांच्या विनंतीनुसार, गेल्या शुक्रवारी जप्त केलेल्या वस्तूंची यादी तसेच शोध वॉरंट प्रकाशित केले. जप्त केलेल्या वस्तूंच्या यादीत कागदपत्रे आणि अनेक बॉक्सचा समावेश आहे. परंतु त्यात पासपोर्टचा स्पष्टपणे उल्लेख नाही.

ट्रम्प चार वर्षात 30,000 पेक्षा जास्त वेळा बोलले खोटे

वॉशिंग्टन पोस्ट वृत्तपत्राच्या तथ्य तपासणाऱ्यांचे म्हणणे आहे की, डोनाल्ड ट्रम्प यांनी 2017 पासून आपल्या चार वर्षांच्या कार्यकाळात 30,000 हून अधिक खोटी किंवा दिशाभूल करणारी विधाने केली आहेत. मात्र ट्रम्प आणि त्यांच्या रिपब्लिकन समर्थकांचे म्हणणे आहे की, अध्यक्ष जो बायडेन यांच्या घसरत्या लोकप्रियतेपासून लक्ष विचलित करण्यासाठी डेमोक्रॅट्सने ट्र्म्प यांच्या संपत्तीवर छापेमारी केली. विशेष म्हणजे 2024 मध्ये ट्रम्प पुन्हा एकदा अध्यक्षपदाची निवडणूक लढवणार असल्याची चर्चा आहे.

- Advertisement -

हेही वाचा ; मुस्लिमांचा अपमान केला तर… रश्दींवरील हल्ल्याच्या आरोपांवर इराणचे उत्तर


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -