घरदेश-विदेशCorona vaccination मोहिमेत भारत, अमेरिका आणि चीन आघाडीवर - WHO

Corona vaccination मोहिमेत भारत, अमेरिका आणि चीन आघाडीवर – WHO

Subscribe

जगभरात कोरोना व्हायरसने अक्षरशः थैमान घातले आहे. अशापरिस्थितीत कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जगभरात तितक्याच मोठ्या प्रमाणात कोरोना लसीकरण मोहिम राबविली जात आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, कोरोना महामारीदरम्यान, आतापर्यंत दोनशे कोटी लसीचे डोस वाटप केले गेले आहेत. भारत, चीन आणि अमेरिका या देशात सर्वाधिक ६० टक्के लस नागरिकांना दिली गेली आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे सरचिटणीस टेड्रोस अॅडनॉम घेब्रेयसिसचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस एल्वार्ड यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, लसीकरणाची ही संख्या अपेक्षेप्रमाणे आहे. संस्थेने कोव्हॅक्स मोहिमेअंतर्गत १२७ देशांना ८ करोड लसीचे डोस दिले आहेत. भारत, अमेरिका आणि चीनला २०० करोडपैकी प्राप्त झालेल्या लसींपैकी ६० टक्के लस त्यांच्याच देशात तयार आणि वितरित करण्यात आले आहेत.

भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांतीदूतांना २ लाख कोरोना लसी पहिल्या खेपेत पाठविल्या आहेत. संयुक्त राष्ट्र संघटनेचे सरचिटणीस यांचे प्रवक्ते अँटोनियो गुटेरेस यांनी ही माहिती दिली. आतापर्यंत जगातील गरीब देशांमध्ये फक्त ०.५ टक्के लस पोहोचली आहे. जी जगातील लोकसंख्येच्या दहा टक्के आहे. तसेच भारतातील सीरम संस्था जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. भारतात आल्यामुळे दुसर्‍या लाटेमुळे सीरम संस्थेतून तयार होणार्‍या लस पुरवठ्यावर परिणाम झाल्याचे ब्रूस एल्वार्ड यांनी सांगितले.

- Advertisement -

अमेरिकन खासदारांनी अध्यक्ष जो बिडेन यांच्या लसी वितरण धोरणाचे कौतुक केले आहे. अमेरिका ८ करोड डोस लस देणार आहे. त्यापैकी अडीच करोड लसींची पहिली तुकडी आता दिली जात आहे. भारत हा देश लस प्राप्त करणार्‍या प्रमुख देशांपैकी एक आहे. जून अखेरीस आठ करोड लस डोस देण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतरच भारताने दोन लाख लस डोस संयुक्त राष्ट्र शांती सैनिकांना विनामूल्य पाठवले होते. त्यानंतर आता संयुक्त राष्ट्राचे प्रमुख अँटोनियो गुटेरेसचे प्रवक्त्याने सांगितले की, सर्व शांती सैनिकांना भारतातून पाठवलेली लस देण्यात आली आहे.


Harshada Shinkarhttps://www.mymahanagar.com/author/sharshada/
गेल्या ५ वर्षांपासून प्रिंट आणि डिजिटल मीडिया क्षेत्राचा अनुभव. लाईफ स्टाईल, फॅशन, महिलांसंबधित विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -