घरदेश-विदेशISIS कमांडर अबू इब्राहिमने अमेरिकेच्या ऑपरेशनमध्ये स्वतःला दिले उडवून, जो बायडेन यांनी...

ISIS कमांडर अबू इब्राहिमने अमेरिकेच्या ऑपरेशनमध्ये स्वतःला दिले उडवून, जो बायडेन यांनी पाहिले लाइव्ह

Subscribe

या मिशनमध्ये 24 स्पेशल ऑपरेशन कमांडोचा समावेश होता. याशिवाय जेट, रीपर ड्रोन आणि हेलिकॉप्टर गनशिपचाही वापर करण्यात आला होता.

अमेरिकन हवाई दल, कमांडो आणि रीपर ड्रोन यांनी गुरुवारी सीरियामध्ये मोठी लष्करी कारवाई केली होती. यामध्ये इस्लामिक स्टेटचा कमांडर इब्राहिम इब्राहिम अल हाश्मी अल कुरैशी (Abu Ibrahim al-Hashimi al-Qurayshi) ठार झाला आहे.

अमेरिकेच्या एअर स्ट्राईकदरम्यान हाश्मीने स्वत:ला बॉम्बने उडवून दिले आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची काही फोटोही समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहेत.

- Advertisement -

अमेरिकन प्रशासनाच्या म्हणण्यानुसार, या मिशनमधील सर्व अमेरिकन नागरिक सुखरूप परतले आहेत. अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. या संपूर्ण ऑपरेशनचे लाईव्ह अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, उपाध्यक्ष कमला हॅरिस आणि राष्ट्राध्यक्षांच्या राष्ट्रीय सुरक्षा दलाने पाहिले आहे. (islamic state)

अबु इब्राहिम अल-हाशिमी अल-कुराशी, ज्याला अब्दुल्ला करादाश किंवा हाजी अब्दुल्ला म्हणूनही ओळखले जाते, हा माजी ISIS प्रमुख अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर संघटनेचा नेता बनला. अबू बकर अल-बगदादीने देखील 2019 मध्ये बारीशा शहराजवळ अमेरिकन सैन्याचे सुरु असलेल्या ऑपरेशनदरम्यान हल्ल्यात स्फोट घडवून आणत स्वतःला उडवून दिले होते.

- Advertisement -

अबु इब्राहिम अल-हाशिमी अल-कुराशी, ज्याला अब्दुल्ला करादाश किंवा हाजी अब्दुल्ला म्हणूनही ओळखले जाते, हा माजी ISIS प्रमुख अबू बकर अल-बगदादीच्या मृत्यूनंतर संघटनेचा नेता बनला. अबू बकर अल-बगदादीने देखील 2019 मध्ये बारीशा शहराजवळ अमेरिकन सैन्याने केलेल्या अशाच हल्ल्यात स्फोट घडवून आणत स्वत:ला उडवून दिले होते.

उत्तर-पश्चिम सीरियामध्ये अमेरिकन लष्कराचे हे ऑपरेशन सुरु होते. 2019 मध्ये याच भागात ISIS चा पूर्वीचा नेता अबू बकर अल-बगदादी हा अमेरिकेन विशेष सैन्याने केलेल्या ऑपरेशनदरम्यान मारला गेला होता. 2011 मध्येही या प्रकारचे सर्च ऑपरेशन सुरु करत ओसाम बिन लादेनचा खात्मा करण्यात आला होता.

या मिशनमध्ये 24 स्पेशल ऑपरेशन कमांडोचा समावेश होता. याशिवाय जेट, रीपर ड्रोन आणि हेलिकॉप्टर गनशिपचाही वापर करण्यात आला होता. या ऑपरेशनची माहिती देत एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, ऑपरेशनच्या सुरूवातीला एका दहशतवादी टारगेटने बॉम्बचा स्फोट घडवून आणला ज्यात त्याच्या स्वतःच्या कुटुंबातील सदस्यांचा मृत्यू झाला. या मृतांमध्ये महिला आणि मुलांचा समावेश होता.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -