कोरोनासाठी तयार केले कमी किमतीचे व्हेंटिलेटर

नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने कोरोनाची सौम्य लक्षणे ओळखणारे व्हेंटिलेटर तयार केले आहे.

40 Ventilators in Akola hospital not use due lack manpower
ऑक्सिजन, व्हेंटिलेटरअभावी जीव जात असताना अकोल्यात ४० व्हेंटिलेटर पडून

जग सध्या कोरोना विषाणूच्या संकटाशी झुंज देत आहे. सर्वात मोठ्या महासत्तेने या विषाणूच्या समोर हात टेकले आहेत. दरम्यान, ‘नासा’ या अमेरिकेच्या अंतराळ संशोधन संस्थेने माणसांमधील कोरोनाची सौम्य लक्षणे दिसावी याकरता कमी किमतीचे व्हेंटिलेटर तयार केले आहे. या उपकरणाला नासा अभियंत्यांनी व्हिटल (व्हेंटीलेटर इंटरव्हेंशन टेक्नॉलॉजी एक्सिसेबल लोकली) असे नाव दिले आहे. या व्हेंटिलेटरद्वारे ज्या व्यक्तींमध्ये कोरोनाची सौम्य लक्षण आढळणार त्या रूग्णांवर या यंत्राव्दारे उपचार केले जाणार आहेत.

दरम्यान, नासाने सांगितले आहे की, सध्या अमेरिकेचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) या यंत्रणेच्या प्रतिक्षेत आहे. मात्र, सध्या या यंत्रणेचा कोरोनाच्या सौम्य लक्षणे असणाऱ्यांवरच उपचार केला जात आहे.

हे व्हेंटिलेटर इतर व्हेंटिलेटरपेक्षा फार स्वस्त आहे. कारण हे व्हेंटिलेटर बनवण्यासाठी कमी साहित्य लागले असून हे बनवण्यासाठी अधिक वेळ देखील लागत नाही. त्यामुळे हे व्हेंटिलेटर फार स्वस्त आहे. – जेडी पोल्क; नासाचे मुख्य आरोग्य व वैद्यकीय अधिकारी

दक्षिण कॅलिफोर्नियामधील नासाच्या जेट प्रपलजन लॅबोरेट्री (जेपीएल) येथे नासाच्या अभियंत्यांनी तयार केले आहे. तसेच हे व्हेंटिलेटर इतर व्हेंटिलेटरप्रमाणे असून ते लावताना व्यक्तीला सर्वप्रथम बेशुद्ध केले जाते. त्यानंतर ऑक्सिजनची एक नळी लावली जाते. दरम्यान, या व्हेंटिलेटरमुळे कोरोनाची सौम्य लक्षणे आढळणाऱ्यांवर उपचार केले जातात. यामुळे कोरोनाचा रुग्ण तात्काळ बरा देखील होईल आणि माणूस देखील वाचेल.


हेही वाचा – …आणि घशात अकडलेला जीवंत मासा डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करून काढला!