न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये सर्वात भीषण आगीची घटना; 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू, 63 जखमी

न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेला असलेल्या 19 मजली अपार्टमेंटला ही आग लागली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून ही आग पसरू लागली होती. या आगीची न्यूयॉर्कमधील सर्वात भीषण अपघातांमध्ये गणना केली जाईल, असे महापौरांनी सांगितले.

america new york apartment fire at least 19 killed in apartment block blaze
न्यूयॉर्कमधील एका अपार्टमेंटमध्ये सर्वात भीषण आगीची घटना; 9 मुलांसह 19 जणांचा मृत्यू, 63 जखमी

अमेरिकेच्या न्यूयॉर्कमधून एक अत्यंत भीषण आगाची घटना समोर आली आहे. न्यूयॉर्कमध्ये रविवारी ब्रॉन्क्समधील एका रहिवासी अपार्टमेंटमध्ये भीषण आग लागली होती. या आगीत जवळपास 19 जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये 9 मुलांचाही समावेश आहे. तर 63 हून अधिक नागरिक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आणली आहे. मात्र ही आग कशामुळे लागली याचा तपास सुरू आहे. न्यूयॉर्कमधील आतापर्यंतच्या सर्वात भीषण आगीच्या घटनांपैकी ही घटना असल्य़ाचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. दरम्यान जखमी नागरिकांना शहारातील पाच वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. दरम्यान या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय.

सीएनएनच्या रिपोर्टनुसार, घटनास्थळी पोहोचलेले न्यूयॉर्कचे महापौर एरिक अॅडम्स म्हणाले की, न्यूयॉर्क शहरासाठी हा अत्यंत भयानक आणि दुःखाचा क्षण आहे. आगीची ही घटना या शहराला त्रास देत राहणार आहे. आगीत मोठ्या प्रमाणात लोक होरपळून मृत्यूमुखी पडल्याचेही त्यांनी सांगितले. तर जखमींपैकी 32 जणांची प्रकृती गंभीर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

america new york apartment fire at least 19 killed in apartment block blaze
दरम्यान या घटनेतील मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होतेय.

न्यूयॉर्कमधील ब्रॉन्क्स प्राणीसंग्रहालयाच्या पश्चिमेला असलेल्या 19 मजली अपार्टमेंटला ही आग लागली होती. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अपार्टमेंटच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या मजल्यावरून ही आग पसरू लागली होती. या आगीची न्यूयॉर्कमधील सर्वात भीषण अपघातांमध्ये गणना केली जाईल, असे महापौरांनी सांगितले. या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या 200 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. यावेळी इमारतीमध्ये अडकले अनेक नागरिक आपली सुटका करुन घेण्यासाठी प्रयत्न करत होते. मात्र सुटकेसाठी दुसरा कोणता मार्ग नसल्य़ाने अनेकांनी खिडकीतून आवाज देत, हात हलवत मदतीसाठी याचना केली.

इमारतीजवळ राहणाऱ्या जॉर्ज किंगने यांनी सांगितले की, या घटनेमुळे लोकांचा एकाचं गोंधळ उडाला होता. ते पुढे सांगतात की, ‘मी येथे 15 वर्षांपासून राहत आहे मात्र अशी घटना मी पहिल्यांदाच पाहिली आहे. मला इमारतीतून धूर निघताना दिसला. मोठ्या संख्येने लोक मदतीसाठी हाक देत होते. लोक खिडक्यांमधून हात हलवत होते.


Mumbai Byculla Fire : भायखळ्यातील मुस्तफा बाग परिसरातील लाकडाच्या गोदामाला भीषण आग