घरदेश-विदेश८० वर्षीय जो बायडन मोदींसोबत निवडणूक लढवणार; पुन्हा व्हायचंय राष्ट्रप्रमुख

८० वर्षीय जो बायडन मोदींसोबत निवडणूक लढवणार; पुन्हा व्हायचंय राष्ट्रप्रमुख

Subscribe

 

नवी दिल्लीः जो बायडन यांना पुन्हा अमेरिकेचा राष्ट्राध्यक्ष व्हायचं आहे. पुढील वर्षी होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी आपण अर्ज भरणार असल्याचे जो बायडन यांनी सांगितले आहे. पुढील वर्षी भारतातही लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आखणी सुरु केली आहे. त्यामुळे या दोन दिग्गजांसाठी २०२४ साल महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -

२०२० मध्ये झालेल्या निवडणुकीत जो बायडन यांनी डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला होता. २०१२ साली जो बायडन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली. त्यांचा कार्यकाळ पुढच्या वर्षी संपत आहे. एका उद्यानाजवळून जात असताना पत्रकाराने जो बायडन यांना प्रश्न विचारला की, तुम्ही पुन्हा निवडणूक लढवणारआहात का?, त्यावर बायडन यांनी ‘हो’ असे उत्तर दिले. त्यामुळे ते राष्ट्रपती पदाची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. अमेरिकेच्या उप राष्ट्रपती कामला हैरिसा ह्या देखील याच पदासाठी पुन्हा निवडणूक लढवणार आहेत.

जो बायडन ८० वर्षांचे आहेत. अमेरिकेचे सर्वात वयोवृद्ध राष्ट्रपती अशी जो बायडन यांची ओळख आहे. फेब्रुवारी महिन्यात जो बायडन यांच्या विविध शारीरीक चाचण्या करण्यात आल्या. त्यांनतर डॉक्टरांनी सांगितले की, जो बायडन हे काम करण्यासाठी फिट आहेत. जो बायडन हे आठवड्यातून पाच दिवस व्यायाम करतात. मानसिकरित्या जो बायडन हे वेगवान आहेत, असे व्हाइट हाऊसमधून सांगण्यात आले. असे असले तरी त्यांनी निवडणूक लढवणे हा ऐतिहासिक निर्णय असल्याचे बोलले जात आहे.

- Advertisement -

२० जानेवारी २०२१ रोजी बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली. अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडेन यांनी शपथ घेतली. भारतीय वंशाच्या आणि अमेरिकेच्या रहिवासी कमला हॅरिस यांनी देखील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यासह उपराष्ट्राध्यक्ष पदाची शपथ घेतली होती.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -