घरदेश-विदेशपेंटागॉनमध्येही भारताचा दबदबा! अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी

पेंटागॉनमध्येही भारताचा दबदबा! अमेरिकेच्या संरक्षण उपमंत्रीपदी भारतीय वंशाचे रवी चौधरी

Subscribe

भारत आणि भारतीयांचे वर्चस्व जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. आता आणखी एका अमेरिकन भारतीय व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने महत्त्वाचे पद दिले आहे.

आज भारतीय वंशाच्या अनेक प्रतिभावंत, कर्तुत्ववान व्यक्तींचा जगभरात डंका आहे. आशिया, आफ्रिका, अमेरिका अशा सर्वच खंडांमध्ये कॉर्पोरेट विश्वापासून ते राज्यसत्तेपर्यंत भारतीय वंशाचे नागरिक आपली दमदार कामगिरी देत आपआपली जबाबदारी समर्थपणाने सांभाळत आहेत. राजकीयच नव्हे तर आता संरक्षण क्षेत्रातही भारतीय वंशाच्या व्यक्तींनी आपला ठसा उमटवला आहे. भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची अमेरिकच्या संरक्षण उपमंत्रीपदी निवड झाली आहे. त्यांच्याकडे अमेरिकी हवाई दलाची जबाबदारी असणार आहे. पेंटागॉनमधील सर्वोच्च पदांपैकी हे एक पद आहे.

भारत आणि भारतीयांचे वर्चस्व जगाच्या कानाकोपऱ्यात आहे. आता आणखी एका अमेरिकन भारतीय व्यक्तीला राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या प्रशासनाने महत्त्वाचे पद दिले आहे. युनायटेड स्टेट्स (यूएसए) सिनेटने बुधवारी भारतीय वंशाचे रवी चौधरी यांची संरक्षण उपमंत्रीपदी नियुक्ती केली. हे पद पेंटागॉनमधील सर्वोच्च पदांपैकी एक आहे. अमेरिकी हवाई दलाची जबाबदारी त्यांच्याकडे देण्यात आली आहे.

- Advertisement -

पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, सिनेटमध्ये झालेल्या मतदानादरम्यान चौधरी यांच्या बाजूने ६५ मते पडली. त्यांच्या विरोधात २९ सदस्यांनी मतदान केलं. चौधरी हे पहिले भारतीय वंशाचे हवाई दलाचे सहाय्यक सचिव बनलेले आहेत. ते मिनियापोलिसचे रहिवासी आहेत.

- Advertisement -

रवी चौधरी यांनी यापूर्वी अमेरिकेच्या परिवहन विभागामध्ये वरिष्ठ अधिकारी म्हणून काम पाहिले आहे. एरोस्पेस आणि संरक्षण तज्ज्ञ असून त्यांनी यापूर्वी अमेरिकन हवाई दलात उच्च पदांवर काम केले आहे. तसेच चौधरी हे अमेरिकन हवाई दलात वैमानिक आणि अधिकारी म्हणून देखील काम पाहिले आहे. चौधरी 1993 ते 2015 या काळात एअरफोर्सचे अॅक्टिव्ह मेंबर होते. या कालावधीत त्यांनी ऑपरेशन आणि फंक्शनल अशा दोन डिव्हीजनचे नेतृत्व केले आहे. सी-17 चे देखीलत ते पायलट होते.

 

चौधरी बद्दल अधिक जाणून घ्या:

  • रवि चौधरी यांच्याकडे जॉर्जटाउन युनिव्हर्सिटी DLS मधून डॉक्टरेट पदवी आहे,
  • सेंट मेरी युनिव्हर्सिटीमधून त्यांनी इंडस्ट्रियल इंजिनीअरिंगमध्ये एमएसचे शिक्षण घेतले आहे.
  • नासा ग्रॅज्युएट फेलो आहे.
  • त्यांनी हवाई विद्यापीठातून ऑपरेशनल आर्ट्स आणि मिलिटरी सायन्समध्ये एमए केले आहे.
  • यूएस एअर फोर्स अकादमीमधून एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण घेतले.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -