‘रशियाने काढलेली लस माकडांच्याही लायकीची नाही’

रशियाने काढलेली लस माकडांच्याही लायकीची नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे.

america refuse to take help from russia over corona vaccine
रशियाने काढलेली लस माकडांच्याही लायकीची नाही

जगातील पहिली कोरोना लस रशियाने विकसित केल्याचा दावा राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केला आहे. यासोबतच त्यांनी ही लस त्यांच्या मुलीला देण्यात आल्याचे देखील सांगितले आहे. पण, घोषणेनंतर अनेक तज्ज्ञांनी रशियांच्या लसीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच अमेरिकेने देखील या लशीची खिल्ली उडवली आहे. ही लस माकडांच्या लायकीचीही नाही, असे अमेरिकेने म्हटले आहे. तसेच चीनने लस बनवण्यात मोठी मेहनत घेतली असल्याचे म्हणत चीनची प्रशंसा देखील केली आहे.

रशियाने कोरोनावर ‘स्पुटनिक व्ही’ (Sputnik V) ही लस शोधल्याचा दावा केला आहे. तसेच जगभरातून १०० कोटींहून अधिक लशींची ऑर्डर रशियाला आली आहे, असे देखील ते म्हणाले आहेत. मात्र, पाश्चिमात्य देशांनी या लशीवर संशय व्यक्त केला आहे. तसेच रशियाने या लशीची माहिती चोरल्यावरुन अमेरिकेने रशियावर आगपाखड केली होती. तसेच ही लस माकडांच्याही लायकीची नाही असे म्हणत अमेरिकेने रशियाची खिल्ली उडवली आहे. तसेच अशा प्रकारच्या लशीची चाचणी आम्ही माकडांवर करतो, असेही अमेरिकेने म्हटले आहे.

लसीसंदर्भात माहिती देण्याची तयारी

या लसीसंदर्भात रशियाने अमेरिकेला सर्व माहिती देण्याची तयारी दाखवली आहे. इतकेच नाही तर लसीचे नमुने देण्यासही रशिया तयार आहे. पण, अमेरिकेने रशियाकडून कुठल्याही प्रकारची मदत घेण्यास तयार नाही. तसेच रशियाने अर्धवट संशोधन करुन ही लस बनवल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे. तसेच रशियाने या लसीची मोठ्या प्रमाणावर चाचणी केली नसल्याचा आरोप अमेरिकेने केला आहे.

दरम्यान, अमेरिकेत जी लस बनवली जात आहे, ती सर्व प्रकारच्या चाचण्या आणि उच्च मानकातून तिचे संशोधन होत आहे. अमेरिकेत जी लस शोधली जात आहे, तिचा सध्या तिसऱ्या टप्पा सुरु असल्याचेही अमेरिकेने स्पष्ट केले आहे.


हेही वाचा – Corona : केंद्रीय आरोग्य मंत्रालयातील सहसचिवाला झाला कोरोना