घरCORONA UPDATEकोरोनाची लस विकसित करण्यासाठी जगाला मदत करण्यास अमेरिकेचा नकार

कोरोनाची लस विकसित करण्यासाठी जगाला मदत करण्यास अमेरिकेचा नकार

Subscribe

लस विकसित करण्यासाठी आणि वितरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करणार नसल्याची भूमिका ट्रम्प प्रशासनाची आहे.

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत असताना तो रोखण्यासाठी अनेक देश प्रयत्नशील आहेत. मात्र, ही कोरोना लस विकसित करण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर संघटितपणे जे प्रयत्न सुरु आहेत, त्यात सहभागी होण्यास अमेरिकेने नकार दिला आहे. जे प्रयत्न सुरू आहेत त्यात सहभागी होणार नाही, असे ट्रम्प प्रशासनाने मंगळवारी जाहीर केले.

लस विकसित करण्यासाठी आणि वितरणासाठी आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करणार नसल्याची भूमिका ट्रम्प प्रशासनाची आहे. अशा प्रकल्पात काम करताना जागतिक आरोग्य संघटनांसारख्या संस्थांमुळे काही गोष्टी कराव्याच लागतील. इच्छेविरुद्ध अशा गोष्टी करणे मान्य नसल्यामुळे अमेरिकेने आंतरराष्ट्रीय समुदायासोबत काम करण्यास नकार दिला असल्याचे सांगितले जात आहे.

- Advertisement -

असोसिएटेड प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांच्यामते, ‘जागतिक आरोग्य संघटना चीनच्या प्रभावाखाली असून WHOमध्ये मोठया प्रमाणावर सुधारणांची आवश्यकता आहे’. कोरोनावरील लस विकसित करण्याच्या प्रकल्पात १५० पेक्षा जास्त देश सहभागी असून हा गट WHO शी जोडलेला आहे. तर अमेरिकेने स्वबळावर लस विकसित करण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम वॉशिंग्टन पोस्टने दिले होते.

दरम्यान, विविध देशांची सरकारे लस उत्पादक कंपन्यांसोबत व्यक्तीगत पातळीवर करार करत आहेत. त्यांना सुद्धा ‘कोव्हॅक्स’ मध्ये सहभागी होण्याचा फायदा होईल. लस उत्पादक कंपनीसोबत एखाद्या देशाचा करार यशस्वी होऊ शकला नाही, तरी ‘कोव्हॅक्स’ च्या माध्यमातून त्या देशाला ती लस मिळू शकते, असे WHO चे म्हणणे आहे.

- Advertisement -

AstraZeneca ची लस चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात

व्हाइट हाऊसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बोलताना असे सांगितले की, AstraZeneca ची लस वैद्यकीय चाचणीच्या तिसऱ्या टप्प्यात पोहोचली असून चाचणी पूर्ण होण्याच्या अगदी जवळ पोहोचली आहे. AstraZeneca ची लस कोरोनाविरोधात वापरण्यासाठी परवानगी मिळेल असा विश्वासही डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला आहे.


Coronavirus: २४ तासात ७८ हजार ३५७ नवे रुग्ण; बाधितांचा आकडा ३७ लाखावर
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -