घरदेश-विदेशH-1B व्हिसाधारकांना दिलासा पण ट्रम्प प्रशासनाने ठेवल्या काही अटी

H-1B व्हिसाधारकांना दिलासा पण ट्रम्प प्रशासनाने ठेवल्या काही अटी

Subscribe

भारतीयांना सर्वाधिक फायदा

अमेरिकेतील डोनाल्ड ट्रम्प प्रशासनाने H-1B व्हिसाधारकांना काहीसा दिलासा दिला आहे. H-1B व्हिसावरील निर्बंध ट्रम्प प्रशासनाने थोडे शिथिल केले आहेत. याआधी H-1B व्हिसाधारकांना अमेरिकेत प्रवेशबंदीचा निर्णय लागू केला होता. यावरुन ट्रम्प प्रशासनावर बरीच टीका करण्यात आली होती. मात्र, आता H-1B व्हिसाधारकांना दिलासा दिला आहे. मात्र, काही अटी ठेवल्या आहेत.

आता H-1B व्हिसाधारक अमेरिकेत जाऊ शकतात परंतु प्रशासनानेही काही अटी घातल्या आहेत. या अंतर्गत, व्हिसाधारक जुन्या नोकरीसाठी परत अमेरिकेत जात असतील तरच त्यांना परवानगी देण्यात येणार आहे. देशाच्या सल्लागार विभागाने म्हटलं आहे की अमेरिकेच्या व्हिसा बंदीमुळे नोकरी सोडणारे नागरिक परत येऊ शकतात आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबाला देखील येण्यास परवानगी देण्यात आली आहे.

- Advertisement -

H-1B व्हिसामुळे अमेरिकन नागरिकांच्या नोकऱ्या संकटात येतात असा ट्रम्प यांनी दावा करत परदेशी नागरिकांना अमेरिकेत रोजगाराची संधी देणाऱ्या H-1B सह वेगवेगळया व्हिसांवर बंदी आणली होती. कोरोनामुळे अमेरिकेत लॉकडाऊन होता. त्यामुळे तिथे मोठया प्रमाणावर बेरोजगारी निर्माण झाली आहे. अशा काळात तिथल्या लोकांच्या नोकऱ्या वाचवण्यासाठी ट्रम्प यांनी वेगवेगळया व्हिसावर बंदी आणली होती. पण आता त्यांनी H-1B व्हिसाधारकांना दिलासा दिला आहे. H-1B व्हिसावरील निर्बंध शिथिल करण्याचा भारतीयांना सर्वाधिक फायदा होणार आहे. H-1B हाच व्हिसा घेऊन भारतीय अमेरिकेत जातात तसेच याच व्हिसावर भारतीय मोठया संख्येन तिथे नोकरी करतात.

H-1B व्हिसा म्हणजे काय?

H-1B व्हिसा हा अस्थलांतरित व्हिसा असून त्याच्या मदतीने परदेशातील लोकांना अमेरिकीन कंपन्यांमध्ये काम करण्याची संधी मिळते. सैद्धांतिक व तंत्रज्ञान कुशलता असलेल्या कर्मचाऱ्यांनाच ही संधी मिळते. तंत्रज्ञान कंपन्या हजारो कर्मचाऱ्यांना परदेशातून घेत असते.

- Advertisement -

हेही वाचा – शरद पवार-पार्थ पवार प्रकरणात आता फडणवीसांची उडी, म्हणाले…


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -