अमेरिकेत तरुणाकडून अंदाधुंद गोळीबार; 4 जणांचा मृत्यू

अमेरिकेत (America) पुन्हा एकदा गोळीबार (Open Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील ओल्काहोमा येथील तुलसा परिसरात असलेल्या सेंट फ्रांसिस रुग्णालयात एका अज्ञात व्यक्तीने अंदाधूंद गोळीबार केला.

firing on ramesh agarwal a trader at shahapur
शहापुरातील व्यापारी रमेश अग्रवाल यांच्यावर अज्ञाताचा गोळीबार

अमेरिकेत (America) पुन्हा एकदा गोळीबार (Open Firing) झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अमेरिकेतील ओल्काहोमा येथील तुलसा परिसरात असलेल्या सेंट फ्रांसिस रुग्णालयात एका अज्ञात व्यक्तीने अंदाधूंद गोळीबार केला. या गोळीबारात तीन जणांचा मृत्यू झाला असून गोळीबार करणाऱ्याचाही मृत्यू झाला आहे.

या गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी धाव घेत अधिक तपासाला सुरूवात केली. या घटनेत तीन जणांचा मृत्यू झाला असून, हल्लेकोराचाही मृत्यू झाल्याची माहिती तुलसा पोलिसांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. तसेच, सेंट फ्रांसिस रुग्णालय रिकामे केले जात आहे.

हेही वाचा – Texas School Shooting : अमेरिकेच्या शाळेत अज्ञाताकडून बेछूट गोळीबार, १८ विद्यार्थ्यांसह ३ शिक्षकांचा मृत्यू

या घटनेच्या पार्श्वभूमीवर कॅप्टन रिचर्ड मुलेनबर्ग यांनी एबीसीला सांगितले की, मेडिकल कॅम्पसमधील इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर रायफल असलेल्या एका व्यक्तीने गोळीबार केल्याचा पोलिसांना फोन आला. अधिकारी घटनास्थळी पोहोचेपर्यंत त्यांना काही लोकांना गोळ्या लागल्याचे आढळले. त्यावेळी एका जोडप्याचा मृत्यूही झाला होता. गोळीबाराच्या मृत्यूचे कारण अद्याप समजू शकलेले नाही, अशी माहितीही त्यांनी दिली.

मंगळवारी अमेरिकेत गाडीच्या पार्किंगवरून वाद झाला होता, त्यावेळी गोळीबार झाला होता. या गोळीबारात वृद्ध महिलेचा मृत्यू झाला होता. तेथे दोन जण जखमी झाले. शिवाय टेक्सासमध्ये झालेल्या गोळीबारात 21 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. गोळीबाराच्या या घटनेने संपूर्ण जग हादरले होते. या घटनेनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी बंदूक धोरण बदलण्याचे आवाहन केले.


हेही वाचा – सोनिया, राहुल गांधींना ईडीचे समन्स