घरदेश-विदेशअमेरिकेसह 'या' 5 देशांमध्ये ट्विटरचे ब्लू टिक सब्सक्रिप्शन सुरू; भारतीयांसाठी मात्र फ्री

अमेरिकेसह ‘या’ 5 देशांमध्ये ट्विटरचे ब्लू टिक सब्सक्रिप्शन सुरू; भारतीयांसाठी मात्र फ्री

Subscribe

जगप्रसिद्ध टेस्ला कंपनीचे सीईओ आणि ट्विटरचे नवे मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरची सूत्र हाती घेतल्यापासून अॅक्शन मोडमध्ये आल्याचे दिसतेय. कर्मचारी कपातीनंतर आता त्यांनी ट्विटरच्या ब्लू टिक सब्सक्रिप्शन बाबत एक मोठा निर्णय घेतला आहे. आजपासून ट्विटरच्या ब्लू टिक सब्सक्रिप्शनला सुरुवात झाली आहे. यामुळे ट्विटर यूर्जसना अकाऊंटवर ब्लू टिक हवी असेल तर त्यांना महिन्याला 8 डॉलर म्हणजे 655 रुपये मोजावे लागणार आहेत. कंपनीने केवळ ISO वर आधारित व्हेरिफाइड युजर्सची हा सब्सक्रिप्शन प्लॅन लॉन्च केला आहे. मात्र अँड्रॉइड युजर्ससाठी अद्याप कोणतीही घोषणा करण्यात आलेली नाह

भारतामध्ये सध्यातरी मोफत सब्सक्रिप्शन

ISO मधील ट्विटर अॅप लिस्टमध्ये भारतात ब्लू टिकसाठी 469 रुपये दाखवत आहेत. पण भारतात हा सब्सक्रिप्शन प्लॅन अद्याप सुरु झालेला नाही. त्यामुळे भारतातील युजर्सनी ही रक्कम भरायची की नाही किंवा ही रक्कम कमी जास्त होईल याबाबत कोणतीही स्पष्टता नाही.

- Advertisement -

‘या’ 5 देशांमध्ये सब्सक्रिप्शन प्लॅन सुरु

एलॉन मस्क यांनी या प्लॅनची सुरुवार केली आहे, मात्र हा प्लॅन अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमधील काही लोकांसाठी सुरु केला आहे. मस्क यांनी ट्विटरच्या या प्लॅनची किंमत प्रति महिना 8 डॉलर ठेवली आहे. मात्र वेगवेगळ्या देशांनुसार या प्लॅनच्या किंमतीत बदल होऊ शकतो.

एलॉन मस्कची ही योजना सुरू झाली आहे. ही योजना अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि ब्रिटनमधील लोकांसाठी सुरू करण्यात आली आहे. मस्कने ट्विटरवर ब्लू टिकची किंमत $8 प्रति महिना ठेवली आहे. तथापि, वेगवेगळ्या देशांनुसार, ही $8 योजना देखील भिन्न असू शकते.

- Advertisement -

ब्लूट टिकबाबत एलॉन मस्क यांचे ट्विट

एलॉन मस्क यांनी स्वत: ट्विटरवरील ब्लू टिकबाबत एक ट्विट केलं आहे. या ट्विटमधून त्यांनी ब्लू टिकच्या प्लॅनबाबत माहिती दिली होती. यात ते म्हणाले होते की, पैसे भरून युजर्स आपल्या ट्विटर अकाऊंटला ब्लू टिक मिळवू शकतात. या प्लॅनमुळे ट्विटर युजर्सला अनेक फायदे मिळतील, याचा एक फायदा म्हणजे आता ट्विटरवर कमी जाहिराती दिसतील.

जर तुम्ही ट्विटरच्या ब्लू टिकसाठी चार्ज केला नसेल तर तुमच्या ट्विट्सला जास्त व्हिजिब्लिटी मिळणार नाही. याशिवाय तुम्हाला आणखी जाहिराती पहाव्या लागतील आणि व्हेरिफाइड होण्याची शक्यता शून्य असेल. याचे कारण असे आहे की, ज्या ट्विटर अकाउंटने ब्लू टिकसाठी पैसे मोजले आहेत त्यांचे अकाऊंट अधिक हायलाइट केले जाईल, ज्यामुळे तुमच्या ट्विटरवर परिणाम होऊ शकतो.


नवी मुंबई विमानतळासाठी बोअर ब्लास्टिंग, 100हून अधिक घरांना तडे

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -