न्यूयॉर्क : अमेरिकेत नववर्ष स्वागताला चांगलेच गालबोट लागले आहे. गेल्या 24 तासात देशात तिसरा मोठा हल्ला झाला आहे. न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथील एका नाइट क्लबमध्ये एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. यात अनेक लोक जखमी झाल्याचे सांगितले जात आहे. काल रात्री पावणे बाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. (america us firing third major attack in america in 24 hours firing in queens club in new york after las vegas)
न्यूयॉर्कमधील क्वीन्स येथील नाईट क्लबमध्ये एका हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. अमजूरा नाइट क्लब असे याचे नाव आहे.
जमैका लॉंग आयलँड रेल्वे रोड स्टेनशजवळ गोळीबार झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांच्या अनेक तुकड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या. ज्यायोगे या भागाची नाकेबंदी करता येईल, परिसर सुरक्षित ठेवता येईल आणि संशयितांना अटक करता येईल. अद्याप संशयितांची ओळख पटलेली नाही. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, या गोळीबारात जखमा झालेल्या लोकांबद्दल काहीही माहिती मिळालेली नाही.
हेही वाचा – Hindu in Bangladesh : हिंदू संत चिन्मय दास यांचा जामीन अर्ज फेटाळला; अपिलात जाण्याचा निर्णय
यापूर्वी अमेरिकेतील न्यू ऑर्लियन्स शहरात नवीन वर्षाचे स्वागत करत असलेल्या गर्दीमध्ये बुधवारी पहाटे एकाने आपला ट्रक घुसवला. आणि नंतर गर्दीवर गोळीबार देखील केला. या हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू तर 35 हून अधिक जखमी झाले. हा हल्ला करणारा ट्रक ड्रायव्हर पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत मारला गेला. त्याची ओळख पटली असून त्याचे नाव शमशुद्दीन जब्बार आहे. अमेरिकन नागरिक असलेला शमशुद्दीन हा टेक्सास येथील राहणारा आहे.
या घटनेनंतर काही वेळातच लासव्हेगास येथे ट्रप इंटरनॅशनल हॉटेलच्या बाहेर टेस्ला सायबरट्रकमध्ये स्फोट झाला. यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आणि 7 जण जखमी झाले. (america us firing third major attack in america in 24 hours firing in queens club in new york after las vegas)
हेही वाचा – IAS Transfer : नवीन वर्षात मुख्यमंत्री फडणवीसांनी भाकरी फिरवली; 12 वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या