घरCORONA UPDATEजागतिक कोरोना अपडेटकोरोनाने अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला; ३० ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज काढावं लागणार

कोरोनाने अमेरिकेची अर्थव्यवस्था डबघाईला; ३० ट्रिलियन डॉलर्सचं कर्ज काढावं लागणार

Subscribe

अमेरिकेचं कोरोना मदत पॅकेजमुळे त्यांचं बजेट २५० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झालं आहे आणि आता दुसर्‍या तिमाहीतही कर्ज घ्यावं लागणार आहे.

कोरोना विषाणूच्या महामारीमुळे अमेरिकेची अर्थव्यवस्था डबगाईला आली आहे. यामुळे अमेरिकेला ३० ट्रिलियन डॉलर्स एवढं कर्ज घ्यावं लागणार आहे. हे सर्व अमेरिकेतील लॉकडाऊन आणि इतर खर्चामुळे झालं आहे. अमेरिकेचे म्हणणे आहे की कोरोना मदत पॅकेजमुळे त्यांचं बजेट २५० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झालं आहे आणि आता दुसर्‍या तिमाहीतही कर्ज घ्यावं लागणार आहे.

दरम्यान, अमेरिकन सरकारवरील कर्जाचा बोजा २५० ट्रिलियन डॉलर्सपेक्षा जास्त झाला आहे, जो तज्ञांच्या मते २००८ मधील मंदीपेक्षा वाईट परिस्थितीकडे लक्ष वेधत आहे. तर २०१९ मध्ये अमेरिकेने केवळ १२.८ ट्रिलियन डॉलर्सचे कर्ज घेतलं. कोरोना संसर्गामुळे देशातील आरोग्य यंत्रणा उद्ध्वस्त झाल्याने अमेरिकेला आरोग्य क्षेत्रासाठी ३० ट्रिलियन डॉलरचे पॅकेज जाहीर करावं लागलं. हे मदत पॅकेज अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेच्या १४ टक्के आहे. तर कोरोनामुळे कर संकलनाची तारीख १५ एप्रिलपासून वाढवावी लागली. यामुळे, सरकारकडे कर्ज घेण्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग शिल्लक राहिलेला नाही. तथापि, यावर्षी अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेची वित्तीय तूट ३७ ट्रिलियन डॉलर्स इतकी आहे, जी देशाच्या जीडीपीच्या १०० टक्के असल्याचं मानलं जातं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus: भारतात कोरोना विषाणूच्या ३० लसींवर संशोधन चालू


अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी लोकांचा जीव धोक्यात न घालता पुन्हा आर्थिक क्रिया सुरू करण्यावर भर दिला आहे. तुम्ही हळू हळू लॉकडाऊन उघडत आहेत तसेच कोरोना विषाणू साथीच्या आजारापासून लोकांचे संरक्षण करत असलेली राज्ये पाहा, असे त्यांनी आवर्जून सांगितले. त्यांनी कबूल केले की दोन्ही बाजूंकडून होणारी भीती न्याय्य आहे. ते म्हणाले, काही लोकांना या आजाराची चिंता आहे, तर इतरांना नोकरी गमावण्याची भीती आहे. लॉकडाऊनमुळे ३ कोटी लोकांच्या नोकऱ्या गेल्यामुळे अर्थव्यवस्था हाताळण्यासाठी सध्या खर्च करण्याची गरज आहे, असं यूएस सेंट्रल बॅंकेचे अध्यक्ष जेरोम पॉवेल म्हणाले.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -