(American Airlines) वॉशिंग्टन : नाताळच्या पूर्वसंध्येला जगातील सर्वात मोठी एअरलाइन ऑपरेटर असलेल्या अमेरिकन एअरलाइन्सची (American Airlines) सेवा काही काळासाठी ठप्प झाली होती. त्यानंतर एअरलान्सने पुन्हा सर्व उड्डाणे सुरू केली आहेत. तांत्रिक बिघाडांमुळे एअरलाइन्सने आपली काही उड्डाणे स्थगित केली होती. त्यामुळे नाताळच्या सुट्टीनिमित्त आप्तांबरोबर प्रवासाला निघालेल्या नागरिकांना त्रास सहन करावा लागला होता. (Airline services are temporarily suspended in the US on Christmas Eve)
फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने (FAA) अमेरिकेला जाणाऱ्या अमेरिकन एअरलाइन्सच्या सर्व फ्लाइटसाठी देशव्यापी ग्राउंडस्टॉप ऑर्डर मागे घेतली आहे. ‘तांत्रिक समस्येमुळे’ अमेरिकेतील आमच्या सर्व उड्डाणांना विलंब झाला आहे. आमच्या टीम्सकडून या समस्येतून शक्य तितक्या लवकर मार्ग करण्याचा प्रयत्न करीत असून यामुळे आमच्या ग्राहकांची जी गैरसोय झाली आहे, त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत, असे एअरलाइन्सने सुरुवातीला निवेदन दिले होते. पण कंपनीने सकाळी आठच्या सुमारास पुन्हा विमानसेवा सुरू केली.
American Airlines grounded all its flights in the U.S. due to an unspecified technical issue, according to the company and a regulatory notice, disrupting the travel plans of thousands of passengers set to fly out for Christmas Eve: Reuters pic.twitter.com/UkZ1ffbgyl
— ANI (@ANI) December 24, 2024
सुट्टीच्या निमित्ताने पर्यटनाला जाण्यासाठी हजारो प्रवासी आलेले असतानाच विविध विमानतळांवर फ्लाइट रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. त्यामुळे त्यांच्यात संभ्रम निर्माण झाला होता. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर याबाबत तीव्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. तर दुसरीकडे, या घटनेमुळे अमेरिकन एअरलाइन्सच्या शेअरच्या दरात 3.8 टक्क्यांची घसरण झाली आहे.
अमेरिकन एअरलाइन्स ही अमेरिकेची प्रमुख विमान कंपनी आहे. प्रवासीसंख्या, प्रवासी विमानांची संख्या आणि निश्चित उत्पन्नाच्या बाबतीत (डेल्टा एअर लाइन्सनंतर) ही जगातील दुसरी सर्वात मोठी विमान कंपनी आहे. अमेरिकन एअरलाइन्स ही एएमआर कॉर्पोरेशनची उपकंपनी आहे आणि तिचे मुख्यालय फोर्ट वर्थ, टेक्सास येथे आहे. (American Airlines: Airline services are temporarily suspended in the US on Christmas Eve)