घरताज्या घडामोडीAfghanistan Crisis: 'अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार हा जगासाठी एक महत्त्वाचा संदेश'

Afghanistan Crisis: ‘अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्याची माघार हा जगासाठी एक महत्त्वाचा संदेश’

Subscribe

अमेरिकेने अफगाणिस्तान सोडताच तालिबानने आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकन सैन्य अफगाणिस्तानातून परतण्यासंबंधित तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, ‘हा जगासाठी एक संदेश आहे. अमेरिकेची हार ही दुसऱ्या हल्लेखोरांसाठी मोठा धडा आहे. शिवाय हा आमच्या भविष्यातील पिढीसाठी एक महत्त्वाचा संदेश आहे.’ अमेरिकन सैन्य परतल्यानंतर काही तासानंतर तालिबानने हे विधान केले आहे.

अमेरिकन सैन्य माघारी परतल्यानंतर तालिबानने आता काबूल विमानतळावर कब्जा केला आहे. अमेरिकन सैन्य माघारी परतल्यामुळे तालिबान जल्लोष करत हवेत गोळीबार केला आहे. काबूल विमानतळावरून अमेरिकेचे अखेरच्या विमानाने उड्डाण केल्यानंतर तालिबानचे प्रवक्ते जबीहुल्लाह मुजाहिद म्हणाले की, ‘अफगाणिस्तानला शुभेच्छा. हा विजय आपल्या सर्वांसाठी आहे. आम्ही अमेरिका आणि संपूर्ण जगासोबत चांगलं नातं बनवू इच्छित आहोत. आम्ही सर्वांसोबत चांगले राजकीय संबंधांचे स्वागत करतो.’

- Advertisement -

यापूर्वी तालिबानचे प्रशासन अफगाणिस्तामध्ये १९९६ पासून २०११ पर्यंत होते. त्यावेळेस महिलांवरील निर्बंध खूप कडक होते. शिवाय न्याय व्यवस्था खूप क्रूर होती. त्यामुळे अफगाणिस्तानमधील लोकं तालिबानच्या प्रशासनाला आता खूप घाबरत आहेत. दरम्यान तालिबानने अफगाणिस्तानात कब्जा केल्यानंतर ६ हजार सैनिक काबूल विमानतळावर तैन्यात केले होते. अफगाणिस्तानतून आपल्या देशातील आणि इतर देशातील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी सैन्य तैन्यात केले होते. आता हे काम पूर्ण झाल्यानंतर अमेरिकन सैन्य माघारी परतले आहेत.


हेही वाचा – काबुलमध्ये युएस मिशन संपुष्टात, अफगाणिस्तान सोडणारे ख्रिस डोन्हाऊ ठरले शेवटचा अमेरिकन सैनिक


Priyanka Shinde
Priyanka Shindehttps://www.mymahanagar.com/author/spriyanka/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव. सोशल मीडियावर काम करण्याची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -