घरदेश-विदेशडोनाल्ड ट्रम्प यांनी १५२ वर्षांची परंपरा मोडली

डोनाल्ड ट्रम्प यांनी १५२ वर्षांची परंपरा मोडली

Subscribe

अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदी शपथ घेणारे डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवार जो बायडन हे अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष ठरणार आहे. अमेरिकेतील सध्याची कोरोना महामारीची स्थिती पाहता चोख बंदोबस्तात हा शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. उपराष्ट्रपती पदावर कमला हॅरीस यादेखील या कार्यक्रमात शपथ घेतील. लिंग आणि वंशभेदाच्या सर्व चौकटी मोडत या पदासाठीची झालेली ही नेमणुक आहे.

दरम्यान अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्ष पदावरून पायउतार होताना जो बायडन यांच्या विजयाचे साधे अभिनंदनही केले नाही. अमेरिकेच्या इतिहासात १८६९ पासून पहिल्यांदाच एखाद्या मावळत्या राष्ट्राध्यक्षाने नव्या राष्ट्राध्यक्षाच्या शपथविधीला हजर न राहण्याची ही इतिहासात पहिलीच वेळ आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाईट हाऊस सोडल्यानंतर एअऱ फोर्स वनच्या माध्यमातून थेट फ्लोरिडा गाठले. मी पुन्हा एका नव्या स्वरूपात येईन अशा स्वरूपाचा संदेश त्यांनी व्हाईट हाऊस सोडताना दिला. ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसचा निरोप घेताना आपले मित्र आणि कुटुंबीयांचे आभार मानले आहेत. मी आपल्यासाठी नेहमीच संघर्ष करत राहीन. काही ना काही करून मी पुन्हा येईन असेही ते म्हणाले. याआधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतंत्र पक्ष काढण्याची घोषणा केली आहे. व्हाईट हाऊस सोडताना त्यांच्या पत्नी मेलानिया ट्रम्प यादेखील हजर होत्या. मी नवीन प्रशासनाला शुभेच्छा देतो असे सांगताना त्यांनी नवीन राष्ट्राध्यक्षांचे साधे नावही घेणे पसंत केले नाही. यापुढच्या काळात मी आपल्यासाठी लढत राहीन आणि देशाच्या उज्वल भविष्यासाठी काम करेन असे आश्वासन त्यांनी दिले.

- Advertisement -

याआधी अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणुकीचा निकाल निकाल समोर आल्यानंतर जो बायडन यांनी पहिले ट्विट करत अमेरिकेच्या नागरिकांचे आभार मानले. अमेरिकेच्या जनतेने मला राष्ट्राध्यक्ष पदापर्यंत पोहचवले हा मी माझा बहुमान समजतो, असेही जो बायडन यांनी या ट्विटमध्ये म्हटले होते. आज बुधवारी जो बायडन अमेरिकेची राष्ट्राध्यक्ष म्हणून शपथ घेतील. डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला. बायडन यांच्या विजयाचा प्रस्ताव संसदेत मांडला जात असताना कॅपिटलमध्ये हिंसाचार भडकला होता. त्यामध्ये काही अमेरिकन नागरिकांना आपला जीवदेखील गमवावा लागला होता. राष्ट्राध्यक्ष पदाची निवडणुक जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात ही लढत सुरुवातीला अत्यंत चुरशीची झाली. मात्र डोनाल्ड ट्रम्प यांना पिछाडीवर टाकत जो बायडन यांनी आघाडी घेतली तेव्हा तेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होणार हे जवळपास स्पष्ट झाले होते. आज अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून जो बायडन शपथ घेतील.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -