घरCORONA UPDATEअखेर डोनाल्ड ट्रम्प आले ताळ्यावर; म्हणाले, 'भारताचं बरोबर'!

अखेर डोनाल्ड ट्रम्प आले ताळ्यावर; म्हणाले, ‘भारताचं बरोबर’!

Subscribe

दोनच दिवसांपूर्वी भारताला धमकी देणारे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजअखेर ताळ्यावर आले आहेत. ४ लाखाहून जास्त अमेरिकी नागरिकांना कोरोनाची लागण झाल्यामुळे अमेरिकेवर मोठं संकट कोसळल्याचं दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर मलेरियावर रामबाण उपाय ठरणाऱ्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची (hydroxychloroquine) मागणी अमेरिकेने भारताकडे केली होती. मलेरियावर उपयुक्त ठरणारी ही लस कोरोनासाठी देखील उपयोगी ठरू शकते म्हणून जगभरात या लसीची मागणी वाढू लागली आहे. मात्र, भारताने ती देण्यास नकार दिल्यानंतर अमेरिकेकडून थेट धमकीची भाषा करण्यात आली होती. आता मात्र डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे.

मंगळवारी रात्री भारताने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर असलेली बंदी अंशत: उठवली. यामध्ये आधी भारताला आवश्यक असलेला साठा काढून नंतरच उरलेल्या हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची निर्यात करण्यासाठी परवानगी देण्यात आली. यादरम्यान अमेरिकेने भारताकडून तब्बल २ कोटी ९० लाख हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या लसींची खरेदी केली. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांना भारताची भूमिका योग्यच असल्याचा साक्षात्कार झाला आहे!

- Advertisement -

काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

ट्रम्प म्हणाले, ‘आम्ही भारताकडून २ कोटी ९० लाखांच्या आसपास हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची खरेदी केली आहे. कोरोना व्हायरसशी लढा देण्यासाठी हे आम्हाला उपयुक्तच ठरणार आहेत. जेव्हा मी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ही विनंती केली, तेव्हा त्यांनी खूप उत्तम प्रतिसाद दिला. पण त्यांनी हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या निर्यातीवर बंदी घातलीये कारण त्यांना ते भारतासाठी वाचवून ठेवायचं आहे’. अमेरिकेच्य अन्न व औषध प्रशासनाने हायड्रॉक्सीक्लोरोक्विनला कोरोनावरचा संभाव्य उपाय म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे एकट्या न्यूयॉर्कमध्ये हायड्रॉक्सीक्लोरोक्विनची सुमारे १५०० नागरिकांवर चाचणी सुरू करण्यात आली आहे.


Corona – …तर आर्थिक रसद बंद करु, अमेरिकेची आता WHO ला धमकी
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -