भारतात धार्मिक स्थळे आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यात होतेय वाढ; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांचा दावा

अँटोनी ब्लिंकन यांनी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील वार्षिक अहवाल सादर करताना ही माहिती दिली आहे.

american secretary of state antony blinken says rising attacks on people and places of worship in india
भारतात धार्मिक स्थळे आणि अल्पसंख्याकांवरील हल्ल्यात होते वाढ; अमेरिकन परराष्ट्र मंत्र्यांची दावा

अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन (Antony Blinken) यांनी भारतातबाबत एक मोठे विधान केले आहे. भारतात धार्मिक स्थळे आणि लोकांवरील हल्ल्यात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे. यावर ब्लिंकेन म्हणाले की, अमेरिका जगाच्या कानोकोपऱ्यातील धार्मिक स्वातंत्र्याचे समर्थन करतो. (US Secretary of State)

अँटोनी ब्लिंकन यांनी आंतरराष्ट्रीय धार्मिक स्वातंत्र्यावरील वार्षिक अहवाल सादर करताना ही माहिती दिली आहे. त्यांनी पाकिस्तान , अफगाणिस्तान आणि चीनचाही यात उल्लेख केला. या ठिकाणीही अल्पसंख्याक समाज आणि महिलांना लक्ष्य केले जात असल्याचे त्यांनी दावा केला आहे. (Antony Blinken on india)

धार्मिक स्वातंत्र्यावर बोलताना अँटनी ब्लिंकन म्हणाले की, उदाहरणासाठी भारताचे उदाहरण दिले जाते. कारण भारत जगातील सर्वात मोठा लोकशाही असलेला देश आहे. याठिकाणी सर्व धर्मांना मानणारे लोक राहतात. मात्र याठिकाणी लोकांवर आणि धार्मिक स्थळांवरी हल्ले होत असल्याचे आपण पाहिले आहे. व्हिएतनाममधील अधिकारी नोंदणी नसलेल्या धार्मिक समुदायांच्या सदस्यांना त्रास देत आहेत. नायजेरियामध्ये काही राज्यांची सरकारे लोकांनी त्यांच्या श्रद्धा व्यक्त केल्याबद्दल बदनामी आणि ईशनिंदा कायद्यांतर्गत शिक्षा करत आहेत. (america on india places of worship)

दरम्यान चीनचा उल्लेख करताना अँटोनी ब्लिंकन म्हणाले की, चीनमध्ये बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लिम आणि ताओवादी समुदायाच्या लोकांची धार्मिक स्थळे नष्ट करण्यात आली आहेत. तर तिबेटी बौद्ध, ख्रिश्चन, मुस्लीम इत्यादी लोकांना तेथे घर आणि रोजगार दिला गेला नाही, असेही ते म्हणाले आहेत.

यावेळी अफगाणिस्तानबद्दल ब्लिंकन पुढे म्हणाले की, तालिबानचे सरकार आल्यानंतर तेथील धार्मिक स्वातंत्र्य पूर्णपणे संपुष्टात आले आहे. मुली, महिलांवरील अत्याचार, त्यांच्यावरील निर्बंध वाढत असल्याचेही ब्लिंकन म्हणाले आहेत. दरम्यान पाकिस्तानबाबत अँटोनी ब्लिंकन यांनी म्हटले आहे की, 2021 मध्येच तेथे ईशनिंदा केल्याप्रकरणी 16 जणांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती.


‘मला माझे आयुष्य पुन्हा मिळाले’; हाय प्रोफाइल मानहानी केसमधील विजयावर Johnny Depp ची प्रतिक्रिया