वाशिंग्टन : अमेरिकेच्या प्रथम महिला जील बायडन मागील चार दिवसांपासून कोरोनाग्रस्त होत्या. त्यानंतर आता केलेल्या चाचणीमध्ये त्यांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून जाहीर करण्यात आली आहे. (America’s First Lady Jill Biden free from Corona; She was suffering from corona for four days)
अमेरिकेच्या फर्स्ट लेडी जिल बायडन यांच्या माहिती कार्यालयाने सोमवार चार सप्टेंबर रोजी काढलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले होते की, प्रथम महिला जिल बायडन यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यांच्यामध्ये कोरोनाचे काहीसे लक्षणे दिसून आले होते. त्यामुळे त्या त्यांचे निवासस्थान असलेल्या डेलावेयरमधेच राहणार आहेत असेही जाहीर करण्यात आले होते. याचदरम्यान व्हाईट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने अशी माहिती दिली होती की, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचा गुरुवारी चौथ्यांदा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला आहे. एकुणच भारतात होऊ घातलेल्या जी-20 शिखर परिषदेला निघण्याआधीच हा अहवाल आल्याने ते भारतात येऊ शकणार आहेकत.
असा असणार आहे बायडन यांचा दौरा
अमेरिकेहून रवाना झाल्यानंतर जो बायडन शुक्रवारी काही वेळ जर्मनीच्या रैमस्टीनमध्ये थांबणार आहेत. त्यानंतर सायंकाळी भारतात येऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय बैठक करणार आहे. तर शनिवारी औपचारिक स्वागत समारंभाच्या कार्यक्रमाला हजर राहून जी-20 च्या पहिल्या सत्रातील वन अर्थ आणि त्यानंतर वन फॅमिली या सत्राला उपस्थित राहणार आहेत.
हेही वाचा : उदयनिधींच्या समर्थनार्थ उतरला अभिनेता कमल हसन; म्हणाला- विचार मांडण्याचा सर्वांना अधिकार
जी-20 नेत्यांसोबत जाणार राजघाटावर
व्हाईट हाऊसने काढलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन हे जी-20 शिखर परिषदेमध्ये विविध कार्यक्रमाला हजर राहल्यानंतर ते परिषदेला उपस्थित असलेल्या प्रमुखांसह डिनरलाही उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी म्हणजेच रविवारी ते G-20 नेत्यांसोबत राजघाटावर जाणार आहेत. त्यानंतर ते नवी दिल्लीहून व्हिएतनामला जातील, जिथे ते कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस गुयेन फु ट्रॉंग यांची भेट घेतील.
हेही वाचा : UIDAI ‘या’ वर्षाच्या शेवटपर्यंत विनामूल्य आधारकार्ड करा अपडेट
स्पेनचे राष्ट्राध्यक्षही कोरोना पॉझिटिव्ह
भारतात होत असलेल्या जी-20 शिखर परिषदेला अनुपस्थित राहणाऱ्यांमध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांचा समावेश होता. आता त्यानंतर स्पेनचे राष्ट्राध्य पेड्रो सांचेझ हे तिसरे राष्ट्राध्यक्ष आहेत की जे भारतात होणाऱ्या जी-20 शिखर परिषदेला उपस्थित राहणार नाहीत.