घरदेश-विदेशAmethi: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे अमेठीत नवे घर; गृह प्रवेशाची तयारी सुरू,...

Amethi: केंद्रीय मंत्री स्मृती इराणींचे अमेठीत नवे घर; गृह प्रवेशाची तयारी सुरू, पाहा फोटो

Subscribe

उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे नवे घर तयार झाले आहे. आता त्यांच्या गृह प्रवेशाची तयारी जोरात सुरू आहे.

अमेठी: उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचे नवे घर तयार झाले आहे. आता त्यांच्या गृह प्रवेशाची तयारी जोरात सुरू आहे. स्मृती इराणी यांनी 2021 मध्ये घर बांधण्यासाठी 11 गुंठा जमीन खरेदी केली होती. या जमिनीवर घर बांधण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. लवकरच स्मृती इराणी त्यात राहू लागतील. याबाबत त्यांच्या समर्थक व भाजप सदस्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. घराचे काही फोटोही समोर आले आहेत. (Amethi Union Minister Smriti Irani s New House in Amethi Preparations for home entry are underway see photos )

2019 च्या लोकसभा निवडणुकीत अमेठीच्या खासदार स्मृती इराणी यांनी जनतेला आश्वासन दिले होते की त्या जिल्ह्यात लवकरच घर बांधतील. याबाबत त्यांनी गौरीगंज येथील मेदन मवई येथे जमीन खरेदी केली होती. यानंतर भूमिपूजनासह त्यांच्या मुलाकडून घर बांधण्याची प्रक्रिया सुरू झाली. जिथे आता घर जवळजवळ तयार झाले आहे आणि त्यांचा गृहप्रवेश लवकरच होणार आहे.

- Advertisement -

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी अमेठीच्या जनतेला आपल्या खासदाराला भेटण्यासाठी दिल्लीत जावे लागणार नाही, असे आश्वासन दिले होते. त्या अमेठीतच घर बांधून लोकांच्या समस्या ऐकून घेणार आहेत. त्यानंतर स्मृती इराणी यांनी घर बांधण्याची प्रक्रिया सुरू केली होती. या महिन्यात त्या त्यांच्या नवीन घरात प्रवेश करणार आहेत.

स्मृती इराणी आगामी लोकसभा निवडणूक त्यांच्या नवीन घरातून लढणार असल्याचे सांगण्यात येत आहे. निवडणुकीची रणनीतीही येथूनच ठरवली जाणार आहे. निवडणूक लढवण्यासोबतच त्या येथे जनता दरबार घेऊन जनतेच्या समस्याही ऐकणार आहेत.

- Advertisement -

याआधीही केंद्रीय मंत्र्यांनी त्यांच्या घरी अनेक कार्यक्रम आयोजित केल्याची माहिती आहे. नुकतेच अयोध्येतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण या नवीन घरातच झाले, ज्यामध्ये स्मृती इराणी सहभागी झाल्या होत्या.

नवीन निवासस्थानाबाबत अमेठीचे भाजप नेते अतुल विक्रम सिंह म्हणाले की, खासदाराचे घर बांधण्यात आले आहे. घराच्या बांधकामामुळे लोकांना त्यांना भेटणे सोपे होईल. दिल्लीला जावे लागणार नाही. केंद्रीय मंत्र्यांनी जनतेला दिलेले आश्वासन पाळले आहे. खासदारांना भेटण्यासाठी पूर्वी लोकांना दिल्लीला जावे लागे.

त्याच वेळी, स्थानिक रहिवासी प्रवीण पांडे म्हणतात की, केंद्रीय मंत्र्यांना अमेठीत घर बांधून मिळाल्यास खूप फायदा होईल. लोकांना अडचणींमुळे दिल्लीकडे धाव घ्यावी लागणार नाही. ते प्रश्न येथे सोडवले जातील. हा एक चांगला उपक्रम आहे.

स्मृती इराणी यांचं अमेठी येथील घर
स्मृती इराणी यांचं अमेठी येथील घर

( हेही वाचा: MVA : महाविकास आघाडीकडून संभाजीराजेंना लोकसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता )

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -