घरताज्या घडामोडीलवकरच अमेरिका चीनवर कारवाई करणार!

लवकरच अमेरिका चीनवर कारवाई करणार!

Subscribe

चीन विरोधात कारवाई करण्याची माहिती व्हाईट हाऊसने दिली.

कोरोनाच्या काळात अमेरिका आणि चीनमधील तणाव वाढत आहेत. तसेच कोरोना व्हायरसच्या संदर्भात अमेरिका सातत्याने चीन विरोधात वक्तव्य करत आहेत. आता चीन विरोधात अमेरिका अधिक कारवाई करण्याची तयारी करत आहे. याबाबत व्हाईट हाऊसने माहिती दिली आहे. पण अद्याप या कारवाईचे नेमके स्वरुप कशा प्रकारे असेल हे सांगण्यात आलेले नाही. बुधवारी व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केली मॅककेनी यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, ‘आपल्याकडून चीनवर कारवाई काय होईल हे मला आधीच जाहीर करता येऊ शकत नाही.’ पण यावेळी हे सांगताना त्यांनी अमेरिकेकडून चीन विरोधात कारवाईची तयारी असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला.

कोरोना व्यतिरिक्त अमेरिका आणि चीनमध्ये तणाव वाढण्याचे इतरही कारणे आहेत. हाँगकाँगमध्ये चीनने नवीन राष्ट्रीय सुरक्षा कायदा लागू केला आहे. तसेच चीनने अमेरिकेच्या पत्रकारांवर बंदी देखील घातली आहे. शिवाय उयगर मुस्लिमांशी झालेल्या चीनमधील व्यवहार आणि सुरक्षेबाबत तिबेटमधील चीनची भूमिका या मुद्द्यावर अमेरिकेने नाराजी व्यक्त केली आहे.

- Advertisement -

कोरोना व्हायरसच्या मुद्द्यांवरून देखील अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे सातत्याने चीनवर आरोप करत आहेत. जगभरात कोरोना व्हायरस पसरण्याचे कारण चीन आहे. तसेच जागतिक आरोग्य संघटना चीनच्या हातातले बाहुले आहे, असे अनेक वक्तव्य अमेरिकेने कोरोना काळात केली आहेत. जगभरात सर्वाधिक अमेरिकेत कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत.


हेही वाचा – भारत-अमेरिकेत होणार कोरोना प्रतिबंधक आयुर्वेदिक औषधांचे क्लिनिकल ट्रायल!

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -