Gadar 2 : सनी देओल आणि अमिषा पटेल यांचा ‘गदर 2’ (Gadar 2) भारतीय बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत इतिहास रचताना दिसत आहे. चित्रपटाला मिळत असलेला प्रतिसाद आणि प्रेक्षकांचे प्रेम पाहून निर्मात्यांसह सनी देओल आणि अमिषा पटेल आपल्या प्रियजनांचे आभार मानताना दिसत आहेत. 11 ऑगस्टला प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने आतापर्यंत 400 करोडपेक्षा जास्त कमाई केली आहे. ‘गदर 2’ चित्रपटात ‘गदर उद जा काले कावा’ आणि ‘मैं निकला गड्डी ले के’ ही दोन गाणी पुन्हा तयार करण्यात आली आहेत. यावरूनच आता वाद निर्माण झाला आहे. या दोन्ही गाण्याचे मूळ संगीतकार उत्तम सिंग (Music composer Uttam Singh) यांनी निर्मात्यांवर राग व्यक्त केला आहे. (Amid the Gadar 2 controversy music composer Uttam Singh alleged What is the matter)
हेही वाचा – सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार न मिळाल्याने अनुपम खेर नाराज
2001 साली अनिल शर्मा यांचा ‘गदर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटातील सर्वच गाणी चांगली गाजली होती. विशेष म्हणजे ‘गदर उद जा काले कावा’ आणि ‘मैं निकला गड्डी ले के’ ही दोन्ही आजही लोकांच्या ओठावर आहेत. उत्तम सिंग यांनी या दोन्ही गाण्यांना संगीत दिले होते. ही दोन्ही ‘गदर 2’ मध्ये पुन्हा तयार करण्यात आली. त्यामुळे उत्तम सिंग यांनी ‘गदर 2’ च्या निर्मात्यांवर राग व्यक्त केला आहे. त्यांची गाणी त्यांना न विचारता दुसर्या संगीतकाराकडून पुन्हा तयार केल्याचा आरोप केला आहे.
उत्तम सिंग यांनी एका हिंदी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, निर्मात्यांनी मला ‘गदर 2’ साठी बोलावले नाही. मला स्वत:ला फोन करून काम विचारण्याची सवय नाही. पण त्यांनी माझी दोन गाणी चित्रपटात वापरली आहेत. यासोबतच त्यांनी मी संगीतबद्ध केलेले पार्श्वसंगीतही वापरले आहे. माझी गाणी वापरण्याआधी एकदा तरी मला विचारायला हवे होते. एवढा तरी शिष्टाचार त्यांच्याकडे असायला हवा होता, अशी नाराजी उत्तम सिंग यांनी बोलून दाखवली आहे.
हेही वाचा – ‘गंगूबाई काठियावाड़ी’ साठी आलियाने पटकावला राष्ट्रीय पुरस्कार
‘गदर 2’ ने आतापर्यंत किती कमाई केली?
अनिल शर्मा दिग्दर्शित ‘गदर 2’ चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. तिसर्या आठवड्याच्या शेवटीही या चित्रपटाने आपली घोडदौड सुरू ठेवली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत एकूण 418.90 कोटी रुपये एवढी कमाई केली आहे. 11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या ‘गदर 2’ ने पहिल्या दिवशी 40 कोटींची कमाई केल्यानंतर पहिल्याच आठवड्यात 284.63 कोटी रुपयांची कमाई केली होती. स्वातंत्र्यदिनी या चित्रपटाने 55.4 रुपये कमाई केली होती. हा चित्रपट आता ‘पठाण’ आणि ‘बाहुबली: द कन्क्लूजन’सारख्या चित्रपटांना टक्कर देताना दिसत आहे. या दोन्ही चित्रपटांनी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर 500 कोटींहून अधिक कमाई केली आहे.