Eco friendly bappa Competition
घर देश-विदेश नासाच्या 'मून टू मार्स' कार्यक्रमाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय

नासाच्या ‘मून टू मार्स’ कार्यक्रमाच्या प्रमुखपदी भारतीय वंशाचे अमित क्षत्रिय

Subscribe

वॉशिंगटन : यूएस स्पेस एजन्सी नासाच्या ‘मून टू मार्स’ कार्यक्रमाचे प्रमुख म्हणून भारतीय वंशाचे सॉफ्टवेअर आणि रोबोटिक्स अभियंता अमित क्षत्रिय हे जबाबदारी सांभाळणार आहेत. नासाने अलीकडेच हा कार्यक्रम हाती घेतला आहे. क्षत्रिय हे तत्काळ ही जबाबदारी स्वीकारतील, असे नासातर्फे सांगण्यात आले आहे. मंगळावर प्रथमच मानव उतरविण्याच्या दृष्टीने ही मोहीम महत्त्वाची आहे.

मानवतेच्या हितासाठी चंद्र आणि मंगळावरील शोधकार्य पूर्ण करणे, हा या नव्या मोहिमेचा उद्देश असल्याचे नासाने आधीच स्पष्ट केले आहे. मंगळावरील वातावरणाचा मानवी दृष्टिकोनातून आवश्यक तो अभ्यास करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम सहाय्यभूत ठरेल. हा कार्यक्रम नासासाठी चंद्रावर दीर्घकालीन कार्य करण्याची तयारी करणार असून जेणेकरून मानवाला प्रथमच मंगळावर पाठवता येईल, असे नासाच्या बिल नेल्सन यांनी सांगितले.

- Advertisement -

नासाच्या ‘मून टू मार्स’ कार्यक्रमाशी संबंधित कार्यालय या मोहिमांसाठी हार्डवेअर आणि रिस्क मॅनेजमेन्ट विकसित करण्याचे काम करेल. हे कार्यालय मिशनचे नियोजन करण्यापासून विश्लेषण करण्यापर्यंतच्या सर्व जबाबदाऱ्या हाताळेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

अमित क्षत्रिय 2003पासून अंतराळ संशोधन क्षेत्रात
अमित क्षत्रिय यांनी 2003 साली अंतराळ संशोधन क्षेत्रात आपल्या करिअरची सुरुवात केली. ते तिथे सॉफ्टवेअर आणि रोबोटिक्स इंजिनीअर म्हणून काम करत होते. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे रोबोटिक्स असेंबल करणे हे त्यांचे मुख्य काम आहे. 2014 ते 2017 पर्यंत अमित यांनी स्पेस स्टेशन फ्लाइट डायरेक्टर म्हणून काम केले. या कार्यकाळात त्यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळवीरांच्या टीमचे ऑपरेशन्स आणि फ्लाइट्सचे संचलन केले होते.

अनेक पुरस्कारांनी सन्मानित
अमित क्षत्रिय यांनी टेक्सास विद्यापीठातून गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. त्याला नासाचे आऊटस्टॅण्डिंग लीडरशिप पदकही मिळाले आहे. त्यांना सिल्व्हर स्नूपी पुरस्कारही मिळाला आहे. अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर यशस्वीपणे घेऊन जाणे आणि त्यांना सुरक्षितपणे परत आणल्याबद्दल हा पुरस्कार दिला जातो. याव्यतिरिक्त, व्यावसायिक ऑर्बिटल ट्रान्सपोर्टेशन सर्व्हिसेस ड्रॅगनच्या रोबोटिक अभियांत्रिकीला देखील सिल्व्हर स्नूपी पुरस्कार दिला जातो.

- Advertisment -