Wednesday, June 7, 2023
27 C
Mumbai
घर देश-विदेश नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदासाठी लालूंशी युती केली; अमित शाहांचा हल्लाबोल

नितीश कुमार यांनी पंतप्रधानपदासाठी लालूंशी युती केली; अमित शाहांचा हल्लाबोल

Subscribe

बिहारच्या राजकारणात गेल्या महिन्यात मोठी राजकीय उलथापालथं होत भाजपची सत्ता केली. या राजकीय घडामोडीनंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा बिहार दौऱ्यावर पोहचले आहेत. सीमांचल परिसरात दोन दिवसांसाठी आलेले अमित शहा शुक्रवारी पूर्णियाला पोहोचले. यावेळी पूर्णियात भाजपच्या जनभावना रॅलीला संबोधित करताना त्यांनी नितीश कुमार आणि लालूप्रसाद यादव यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मी बिहारमध्ये आल्याने लालू आणि नितीश कुमार ना पोटदुखी झाली म्हणत नितीशकुमार यांनी भाजपशी गद्दारी करून स्वार्थाचे आणि सत्तेचे राजकारण सुरू केल्याचे आरोपही अमित शहा यांनी केला आहे.

लालूप्रसाद यादव नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करत अमित शहा म्हणाले की, माझ्या येण्याने लालू आणि नितीश यांना पोटदुखी होत आहे. ते मी भांडण करण्यासाठी आल्याचे सांगत आहेत. लालूजी तुम्ही भांडण लावून देण्यासाठी तुम्ही पुरेस आहात, आयुष्यभर तुम्ही हेच काम केले, लालूजी सरकारमध्ये आल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पण मी सीमाभागातील जनतेला सांगण्यासाठी आलो आहे की, हा सीमावर्ती जिल्हा भारताचाच भाग आहे, इथे कोणालाही घाबरण्याची गरज नाही, कारण केंद्रात नरेंद्र मोदींचे सरकार आहे. ही गर्दी लालू-नितीश सरकारसाठी धोक्याचा इशारा असल्याचेही अमित शहा म्हणाले.

- Advertisement -

अमित शहा पुढे म्हणाले की, बिहारची ही भूमी परिवर्तनाचे केंद्र आहे. इंग्रजांच्या विरोधातील स्वातंत्र्य चळवळ असो किंवा इंदिराजींची आणीबाणी असो, त्याविरोधातील चळवळ बिहारच्या भूमीतूनच सुरू झाली. आज भाजपला फसवून, लालूंच्या मांडीला मांडी लावत बसून, स्वार्थ आणि सत्तेच्या राजकारणाचा जो परिचय नितीशजींनी दिला असा आरोप करत त्याची सुरुवातही याच भूमीतून होणार आहे. आम्ही स्वार्थ आणि सत्तेच्या राजकारणाऐवजी सेवा आणि विकासाच्या राजकारणाच्या बाजूने आहोत. अस अमित शहा म्हणाले.

लालूजी नितीशजी तुमचीही फसवणूक करतील

अमित शहा यांनी नितीश कुमार यांच्यावर हल्लाबोल करत म्हटले की, तुम्ही आधी जनता पार्टी देवीलाल गटासोबत गेलात, मग लालूजींसोबत फसवणूक केली. लालूजी तुम्ही काळजी घ्या, उद्या नितीशबाबू तुम्हाला सोडून काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून बसतील आणि कोणाला कळणार नाही. नितीश यांनी सर्वात मोठी फसवणूक कोणाची केली असेल तर ती देशाचे दिग्गज नेते जॉर्ज फर्नांडिस यांची केली आहे. त्यांच्या खांद्यावर बसून जनता पक्षाची स्थापना केली आणि जॉर्ज बाबूंची तब्येत बरी नसताना त्यांना हटवून राष्ट्रीय अध्यक्ष बनवले. शरद यादव यांच्यासोबतही त्यांनी तेच केले. त्यानंतर भाजपसोबत फसवणूक, जीतनराम मांझी, रामविलास पासवान यांच्यासोबत फसवणूक केली. नितीशकुमारांनी खुर्ची वाचवण्याशिवाय काहीही केले नाही. पंतप्रधान होण्याच्या लालसेने ते पुन्हा लालूजींसोबत गेल्याचा आरोपही शहा यांनी केला आहे.

- Advertisement -

नितीश कुमार लालूप्रसाद यादव यांना अमित शहा म्हणाले की, तुम्ही बिहारच्या जनतेसोबत फसवणुक केली आहे. तुम्हा सांगा, तुम्ही मला सांगा, तुम्ही मोदीजींसोबत जायला मत दिले की लालूजींसोबत जायला? तुम्ही मोदीजींच्या नावावर मते घेतलीत, पण लालूंसोबत का गेलात? सीमांचलच्या जनतेला अमित शहा म्हणाले की, सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये घाबरण्याची गरज नाही, लालू-नितीश जोडी आली असेल, पण वरती नरेंद्र मोदींचे सरकार आहे. सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये मनमानी करण्याचे धाडस कोणाचेच नाही. शिष्टाई दाखवून आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केले. नितीशबाबू, तुम्हाला आमच्याकडून अर्धी जागा मिळाली आणि तुम्ही निम्मी केली. मोदीजींनी आश्वासन दिले होते की, आम्ही नितीशजींच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवू, असे अभिवचन दाखवून तेव्हाही आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री केले होते. पण लोकसभेची निवडणूक जवळ आली, तुम्ही पंतप्रधान होण्यासाठी काँग्रेस आणि लालूजींच्या मांडीला मांडी लावून बसलात. बिहारचे लोक तुम्हाला ओळखत नाहीत का? असाही ते म्हणाले.

अमित शाह म्हणाले की, नितीश कुमार कधीही पंतप्रधान होऊ शकणार नाहीत आणि बिहारमध्येही सरकार चालणार नाही. 2024 च्या लोकसभा निवडणुकीत लालू-नितीश यांचा जनता फैसला करेल, त्याचवेळी 2025 च्या विधानसभा निवडणुकीत बिहारमध्ये भाजपचे पूर्ण बहुमताचे सरकार स्थापन होणार आहे. नितीशकुमारांना फक्त खुर्ची आवडते. ते कोणत्याही पक्षाशी युती करतात. लालूजी सरकारमध्ये असताना त्यांना कोण वाचवणार? त्यांनी शपथ घेतल्यापासून बिहारमधील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली आहे. नितीशजी याला षड्यंत्र म्हणत आहेत. बिहारवर जंगलराजचा धोका निर्माण झाला आहे. असा आरोपही अमित शाह यांनी केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यावर आहेत. बिहारमधील सरकारमधून बाहेर पडल्यानंतर भाजपच्या वरिष्ठ नेत्याचा हा पहिलाच बिहार दौरा आहे.


मी दोन टर्मचा खासदार, कुठे बसायचं हे मला कळतं; श्रीकांत शिंदेंचा ‘त्या’ फोटोप्रकरणी राष्ट्रवादीवर पलटवार

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -